सिंदेवाही प्रतीनिधी:- सिंदेवाही तालुक्यातील खातगाव ग्रामपंचायत सदस्य प्रेमिला अरुण चहांदे या स्वत:च्या मनमानीने त्यांच्या शेजारील रामचंद्र दशरथ नागदेवते यांच्या जागेवर अतिक्रमन करून आपले शौचालय बांधकाम करीत आहेत. Arbitrary policy of Khatgaon Gram Panchayat member Premila Chahande
या संदर्भात स्थानीय ग्रामपंचायत खातगाव येथे अर्ज सादर करूनही त्यावर ग्रामपंचायत प्रशासन कुठलीही कार्यवाही करत नाही आहे. रामचंद्र दशरथ नागदेवते हे खातगाव येथील रहिवासी असुन त्यांच्या हद्दीतील जागेवर त्यांचे शेजारी वास्तवात असलेले अरुण लाकडू चहांदे व त्यांच्याच पत्नी ग्रामपंचायत सदस्य प्रेमिला अरुण चहांदे हे दांपत्य वास्तवात अरेरावी करून आपले शौचालय उभारून राहिले आहेत. सदर शौचालाय बांधकाम करतांना ग्रामपंचायत प्रशासनास कुठल्याही प्रकारची विचारना न करता आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा गैरवापर करून रामचंद्र दशरथ नागदेवते यांच्या हद्दीतील विटांची भींत फोडून स्वत:च्या मनमानीने शौचालयाचा बांधकाम करून राहिले आहेत. या समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासनास अर्ज देऊनही कार्यवाही करण्यास दिरंगाई करीत आहेत. वास्तवात ग्रामपंचायत सदस्य प्रेमिला अरुण चहांदे स्वत:च्या मर्जीने शौचालाय बांधकाम करत असूनही वार्ड मेंबर व सरपंचाची तसेच ग्रामसेवकाची कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे चित्र उघडकीस येत आहे. ग्रामविकास करीता ग्रामपंचायत कार्यरत असतांना ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी गप्प बसले आहेत ही शोकांतीका आहे. याबाबत ग्रामविस्तार अधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती, पंचायत समितीचे घरकुल अधिकारी व संबंधीत प्रशासनाने चौकशी करून समस्या मिटविणे आवश्यक ठरत आहे.
0 comments:
Post a Comment