अर्धवट जळालेल्या मृतदेह मिळाल्याने तुकूम परिसरात खळबळ
चंद्रपुर :- चंद्रपूर शहरातील तुकूम भागातील लॉ कॉलेज समोर जळालेल्या अवस्थेत शव आढळल्याने खळबळ उडाली. लॉ कॉलेज समोरील निर्जन भागात काल रात्री हे शव आढळले. या भागात तैनात सुरक्षा रक्षकाला जोरदार भडका दिसल्यावर घटनास्थळी धाव घेतल्यावर हा प्रकार लक्षात आला. गिरीश पदमावार 60 असे मयताचे नाव असून तो तुकूम भागातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. याच ठिकाणी मयताची दुचाकी आणि पेट्रोल भरलेली कॅन आढळली. माहिती मिळताच रामनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोचले. शव पोस्टमोर्टमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. या सेवानिवृत्त इसमाच्या आत्महत्या प्रकरणातील कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.
0 comments:
Post a Comment