चंद्रपुर :-चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट बाहेरील स्वर्गीय डॉक्टर वसुधा झाडे नर्सिंग कॉलेज येथे शुक्रवार दिनांक 22 एप्रिल रोजी वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन यावेळी कार्यक्रमाला नर्सिंग महविद्यालय व इको-प्रो संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे व कॉलेजच्या संचालिका डॉ. नंदाली झाडे यांची उपस्थिती होती.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक पर्यावरणाची माहिती कळावी, आरोग्यासाठी पर्यावरण राखणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत जनजागृती व्हावी या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वसुंधरेच्या रक्षणासाठी, आपले सभोवतालचे पर्यावरण व एकंदरित परिस्थितिकीचे संरक्षणाच्या चळवळीत प्रत्येकाचा खारिचा वाटा असणे काळाची गरज आहे. पुढच्या पिढीला निरोगी, प्रदूषणरहित, निसर्गसंपन्न अशी पृथ्वी सोपविण्याकरिता या पिढीला अधिक सजगपणे वागणे, जल, जंगल, जमीन यांच्या संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचे इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी वसुंधरेच्या -हासाबद्दल पथनाट्यातून मांडणी करत बदलत्या पर्यावरणामुळे मानवी जीवनाच्या आरोग्यावर कसा परिणाम होत आहे, हे पथनाट्यातून सादर केले. 1960 च्या दशकातिल पर्यावरणपूरक जीवनशैली, नैसर्गिक शेती, निसर्गावर निर्भरता, संसाधनाचा गरजेपुरता वापर तर 2020 मधील अतिरेकी विकास, रासायनिक ख़ताचा वापर, औद्योगिकीकरण, प्रदूषण यामुळे मानवी जीवन किती संकटात आले आहे हे सांगण्याच्या प्रयत्न करण्यात आला. काही विद्यार्थिनींनी पोस्टर चित्र सादर करीत पृथ्वीचे महत्त्व व्यक्त केले. कार्यक्रमात वसुंधरेचे रक्षणासाठी सामूहिक शपथ देखील घेण्यात आली.
यावेळी नर्सिंग कॉलेज च्या प्राध्यापिका श्वेता घरडे, प्रा. ऋतुजा झाडे, प्रा. डॉ. स्नेहल पाटिल, प्रा. सुजाता चालूरकर, प्रा. बुद्घांगिनी दुबे, प्रा. ज़ेबनाज शेख, प्रा. सदाफ उपस्थित होत्या तर इको-प्रो तर्फे सचिन धोतरे, अनिकेत दुर्गे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.


0 comments:
Post a Comment