भद्रावती :-मगील दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे सामाजिक व समाज कार्यक्रमापासून वंचित झाले होते. पण आता आनंदाची बातमी आहे. दि. ०२/०५/२०२२ रोज सोमवारला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह पाणीच्या टाकि जवळ चंद्रपूर येथे भव्य अशा उपवर- वधु परीचय मेळावा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे.
समाजातील युवक- युवती व लहान मुलांना आपल करियर फॅशन शो मध्ये घडविता याव यासाठी त्यांना मंच उपलब्ध करून देऊन त्यांच्यासाठी भव्य असा फॅशन शो चे आयोजन या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. ज्या नाभिक समाज बांधवांनी कोणतेही स्वार्थ न बाळगता समाजाच्या कार्यासाठी आपल्या जीवनातला अमूल्य वेळ समाजासाठी दिला. समाजाच्या गोरगरीब बांधवांसाठी खर्ची घातला अशा समाज बांधवांना मानाचा " आदर्श नाभिक समाज सेवक पुरस्कार"आपल्या प्रमुख पाहुण्यांचे उपस्थित देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घघाटक - श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार ( माजी अर्थमंत्री नियोजन व वनमंत्री), कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री. रविभाऊ बेवपत्रे( महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेश अध्यक्ष)
प्रमुख उपस्थिती - श्री.अरुणजी जमदाडे म. ना. महामंडळ प्रदेश सचिव, श्री. दिपकराव नक्षिणे माजी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, श्री. सुभाषभाऊ गुंडलवार नाभिक जनकल्याण अध्यक्ष नागपूर, श्री. संतोषभाऊ मोतेवार तेलगू समाज अध्यक्ष यवतमाळ, श्री. सुधिरभाऊ पंदिलवार जेष्ठ समाज सेवक चिमुर,श्री.मोहनजी वनकर तेलुगू समाज अध्यक्ष चंद्रपूर, श्री. सुरेश मांडवकर जेष्ठ नाभिक समाज वणी, श्री. डॉ संतोष मैदनकर प्रदेश कार्यकारी चिटणीस, श्री. डॉ राजुभाऊ कन्हेरकर प्रदेश युवा उपाध्यक्ष, श्रीमती माधुरीताई पारपल्लीवार प्रदेश महिला प्रमुख कोल्हापूर, सौ. जयश्रीताई फुंडकर महिला प्रांत संघटक, श्री. ऍड अमोल अलोणे प्रांत संघटक म. ना. मं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभांगीताई प्रदिप वाटेकर राजुरा चंद्रपूर जिल्हा कमिटीचे श्री.रवींद्र येसेकर जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, श्री. संतोष नापीत जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर, श्री. देवेंद्र वाटकर जिल्हा कार्याध्यक्ष बल्लारपूर,श्री.अजय खडसिंगे जिल्हा कार्याध्यक्ष ब्रम्हपुरी, श्री मनोज पिजदुरकर जिल्हा सचिव चंद्रपूर, श्री. अरुण चिंचोलकर उपाध्यक्ष चंद्रपूर, श्री. विशंभरराव मांडवकर कोषाध्यक्ष, श्री. सचिन नक्षिणे महाराष्ट्र नाभिक युवा महामंडळ जिल्हा अध्यक्ष भद्रावती.यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी आपल्या नाभिक समाज बांधवांनी या कार्यात सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा चंद्रपूर यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment