Ads

महानगरपालिकेच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे "दे टक्का" आंदोलन

चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालीके व्दारे नियम धाब्यावर बसवून बगिचा, शाळा व ट्रक टर्मिनल करीताचे आरक्षण काढुण पुरपिडीत निळया रेषेने निर्देशित जागेला निवासी उददेशासाठी मंजुर करण्यात आलेले ठराव रद्द करण्यात यावे या मागणीकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात आज चंद्रपूर शहर नगरपालिके विरोधात आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूर शहराच्या पुनर्रचीत विकास आराखडयात बागिचा, शाळा व ट्रक टर्मिनल करीता आरक्षित झालेली आणि पुरपिडीत प्रभाग म्हणून निळया रेषेने निर्देशित केलेली जागा गर्भश्रीमंताच्या अर्थपुर्ण व्यवहारातुन निवासी उददेशासाठी परिवर्तीत करण्याचा ठराव शहर महानगरपालिकेने घेतला होता. विरोधकांना आक्षेप नोंदविण्याची संधीच मिळू नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी अवघ्या १० मिनीटात सभा गुंडाळली होती त्यामुळे मोठा गदारोळ झाला होता.
चंद्रपूर शहर महानगरपालीकेची बुधवार दिनांक २३/०२/२२ ला ऑनलाईन सभा घेण्यात आली होती. या सभेत विषय ६६ मध्ये चांदा रे भूमापन क्र. ४९/२.०० हेक्टरवरील आरक्षण आणि क्र.१७ पार्क आरक्षीत १.१० हे क्षेत्र विकास आरखडयातुन वगळून निवासी प्रभागात समाविष्ट करणेबाबत तसेच विषय क्र.६७ मधील सर्व्हे क्र.१२/२ वडगांव येथील ०७५ हेक्टरची जमीनी वरील आरक्षण वगळून राहिवासी विभागात समाविष्ट करणे हे दोन विषय मंजुरीसाठी सभेत ठेवण्यात आले. हे दोन्ही विषय वा पुर्वी देखील सभेत ठेवण्यात आले होते त्यावेळी देखील अनेक नगरसेवकांनी विरोध केल्याने ना मंजुर करण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेससह सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीही विरोध केला होता. व म्हणून यावेळी दोन्ही विषय सभापटलावर आणुन अवघ्या १० मिनीटातच मंजूर करून घेतली व सभा आटोपली.

अर्थपूर्ण व्यवहारातुन बगिचा, शाळा व ट्रक टर्मिनल करीताचे आरक्षण कारण पुरपिडीत निळया रेषेने निर्देशित जागेला निवासी उददेशासाठी मंजुर करण्यात आलेले ठराव हे सामान्य नागरिकांवरील अन्याय करणारे आहे. भाजपा सत्ताधार्यांनी अर्थपूर्ण व्यवहारातून बहुमताच्या जोरावर घेतलेले हे निर्णय भविष्याच्या दृष्टीने शहराचे नुकसान करणारे आहे. प्रत्येक सत्ताधान्यांनी जर पुनर्रचीत विकास आराखडयात आरक्षित जागेचे आरक्षण काढले तर भविष्यात शहर विदृप होईल. असे हे निर्णय सर्वसामान्य नागरीकांवरील अन्यायकारक ठरणारे आहे.

व म्हणून महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे व नगर विकास राज्यमंत्री मा.ना.श्री. प्राजक्तजी तनपुरे यांना लेखी निवेदन पाठवून विशेष अधिकार वापरून तात्काळ सदर दोन्ही ठराव रद्द करण्याचे आदेश दयावे हि सविनय विनंती करण्यात आली आहे.

सदर आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष तीमोती बंडावार, रोशन फुलझेले, राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सेजुळ, नितीन घुबडे, ग्रामपंचायत सदस्य अंकिता धेंगारे, पवन बंडीवार, मानव वाघमारे, सौरभ घोरपडे, पवन मेश्राम, राहुल भगत, प्रफुल कुचनकर, सोनू वासनिक, केतन जोरगेवार, शुभम आंबोडकर, ग्रामपंचायत सदस्य अनुकूल खन्नादे उपस्थित होते.



Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment