Ads

त्रिवेंद्रम येथील फोर्थ नॅशनल मास्टर्स गेम्स मध्ये शिवराज मालवी यांना 1सुवर्ण,3 रजत व 1कास्य पदक

ब्रम्हपुरी:-मास्टर्स गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया संलग्नित मास्टर्स गेम्स असोसिएशन केरला यांच्या तर्फे दिनांक 18मे ते 22मे दरम्यान त्रिवेंद्रम येथे (4 th )फोर्थ नॅशनल मास्टर्स गेम्स 2022 चे आयोजन करण्यात आले. त्यात सर्व प्रकारच्या वैयक्तिक व सांघिक खेळाचा समावेश होता त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडा जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.25 वर्षापुढील सर्व वयोगटातील. महिला व पुरुष क्रिडापटुसाठी स्पर्धा आयोजित असल्यामुळे देशातील सर्व राज्यातुन केरळ, कर्नाटक, गुजरात, पंजाब,हरीयाना, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू,आसाम, अरुणाचल प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यामधुन 25 वर्षापुढील सर्व वयोगटातील महिला व पुरुष विविध क्रिडाप्रकारात खेळाडू सहभागी झाले होते.सर्व स्पर्धकांची एकुण संख्या जवळपास 4000 च्या वर होती.Shivraj Malvi wins 1 gold, 3 silver and 1 bronze medal in 4th National Masters Games in Trivandrum

याच फोर्थ नॅशनल मास्टर्स गेम्स2022 मध्ये जलतरण स्पर्धेचा सुद्धा समावेश असल्याने विविध राज्यातुन 25 वर्षापुढील वयोगटातील 300 च्या वर जलतरणपटूनी सहभाग घेतला.महाराष्ट्राच्या चमुमधुन ब्रह्मपुरी येथील शिवराज मालवी हे सुद्धा सहभागी झाले.सेवानिवृत्तीनंतरही आपला पोहण्याचा सराव कायम ठेवुन विविध जलतरण स्पर्धेमध्ये सहभागी होत आले व प्रत्येक स्पर्धेतून पदक प्राप्त करत आले.
फोर्थ नॅशनल मास्टर्स गेम्स मध्ये सुद्धा सहभागी होऊन 100 मिटर बॅकस्ट्रोक मध्ये सुवर्ण पदक, 4X50मिटर फ्रिस्टाईल रिलेमध्ये रजत पदक,4X50 मिटर वैयक्तिक मिडले रिलेमध्ये रजत पदक, 100 मिटर फ्रिस्टाइल प्रकारात कांस्य पदक तर 4X50मिटर सामुहिक मिडले रिलेमध्ये रजत पदक प्राप्त केले असे एकून 5 पदकं प्राप्त केले व आपली पदक प्राप्त करण्याची क्षमता सिद्ध केली.त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण ब्रम्हपूरी वाशियानी अभिनन्दन केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment