Ads

ताडोबातील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

चंद्रपुर :-ताडोबा जंगलातील वाघांची शान म्हणजे "वाघडोह" हा वाघ म्हातारा व अशक्त आहे मात्र म्हाताऱ्या वयात सुद्धा शिकार करीत गुरख्याला ठार केले. Tadoba big tiger attack शहराजवळील सिनाळा गावातील 65 वर्षीय दशरथ पेंदोर हा काल 20 मे ला गावालगत असलेल्या तलावाजवळ बकऱ्या चारण्यासाठी गेला होता, मात्र सायंकाळी गावात दशरथ परत न आल्याने नागरिकांनी शोधाशोध सुरू केली पण दशरथ चा शोध लागला नाही. Wagh doh
आज सकाळी नागरिकांनी पुन्हा शोध घेतला असता तलावजवळील काही अंतरावर दशरथ चा छिन्न विच्छिन्न अवस्थेतमृतदेह नागरिक व वन कर्मचाऱ्यांना आढळून आला.
मागील काही दिवसांपासून सिनाळा परिसरात ताडोब्यातील सर्वात मोठा वाघ "वाघडोह" चा वावर आहे, अतिशय अशक्त व म्हातारा असल्याने वनविभागाने त्याच्यावर नजर ठेवली होती, मात्र वनविभागाची नजर चुकताच त्याने शिकार केली. सदर घटनेमुळे ग्रामस्थांचा वनविभागावर रोष व्याप्त झाला आहे.
'वाघडोह' वाघाच्या हल्ल्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर चव्हाण बचावले
वाघाच्या हल्ल्यात सिनाळा गावात इसम ठार झाल्याचं माहिती होताच दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील धुळे हे टीम सह घटनास्थळी भेट देऊन चौकशी करीत असतानाच अचानक वाघाने पोलीस H.C.प्रभाकर चव्हाण यांच्या दिशेने हल्ला चढवला चव्हाण यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी जवळ असलेल्या नाल्यात उडी घेतली. तिथे उपस्थित ठाणेदार धुळे साहेबांनी समयसूचकता दाखवत आरडाओरडा केला सोबतच तिथे जमा लोकांच्या मदतीने वाघाला हुसकावून लावले. चव्हाण हे वाघाच्या हल्ल्यातुन सुदैवाने बचावले. सर्वांनी सुटकेचाश्वास सोडला.
H .C चव्हाण यांच्या बाबती हे म्हणावे लागेल "काळ आला होता पण वेळ आली नव्हती." सुदैवाने कोणतीही जीवित हाणी झाली नाही..
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment