Ads

सुगंधीत तंबाकु विक्रेत्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची धाड

भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाकु हा शरीरास हानीकारक असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदि आनलेली आहे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा हे पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना सुरक्षा नगर भद्रावती येथे राहणारा विजय गायकवाड हा प्रतिबंधित सुगंधित तंबाकुची मोठया प्रमाणावर साठवणु करून तो त्याचे राहते घरी आपल्या मारोती कारणे अवैद्य रित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाकुची विक्री करीत असल्याची मुखबिरव्दारे गोपनीय खात्रीशीर खबर मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांनी त्याचेवर छापा मारून कायदेशीर कार्यवाही केली.
सदर कारवाई मा. अपर पोलीस अधिक्षक, सा. चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात त्यांनी त्यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय वरोरा मधिल पो. कर्म. ची एक टिम व पोलीस स्टेशन भद्रावती येथील पो. कर्म. ची एक टीम तयार करून पंचा समक्ष विजय गायकवाड याची मालकीची असलेली मारूती ओमनी कार क्र. एम. एच ३४ एए ३११९ ची झडती घेतले असता सदर कार मध्ये १) सुगंधित तंबाकु मजा १०८ तंबाकुचे ५० ग्रा. वजनाचे डब्ये प्रत्येकी बॉक्स मध्ये १० डबे असे एकुन २० खरडयाचे बॉक्स प्रतयेकी बॉक्स २५०० रू प्रमाणे एकुन किंमत ५०,०००/- रु, २) ईगल जेल सुगंधित तंबाकु प्रत्येकी ५०० ग्राम वजनाचे १० डबे प्रत्येकी किंमत १,०००/- रू प्रमाणे एकुन किंमत १०,०००/-रू, ३) एका प्लॉस्टीक बॅग मध्ये ईगल हुक्का शिश्या तंबाकु एका पॉकीत मध्ये १० पाउच ४० ग्राम वजनाचे असे एकुन [४ बॅग मध्ये ४० पाउच प्रत्येकी नग १,०००/- रू प्रमाणे एकुन किं ४०,०००/-रू, ४) एका प्लॉस्टीक चुंगडीत मजा १०८ सुगंधित तंबाकु २०० ग्राम वजनाचे ४० डब्बे प्रमाणे असा एकुन ७ चुंगडी मध्ये २८० डब्बे प्रत्येकी प्रमाणे एकुन किमत. २,८०,०००रू, ५) एका नायलोन थैली मध्ये मजा १०८ सुगंधित तंबाकु २०० ग्राम वजनाचे एकुन ३२ डब्बे प्रत्येकी डब्बा १००० प्रमाणे एकुन किंमत ३२,०००/- रु, ६) एक जुनी वापरती मारोती ओमनी कार क्र. एम. एच ३४ एए ३११९ किंमत १,००,००० रू असा एकुन ५,१२,००० रू चा माल अवैद्य रित्या मिळुन आल्याने पंचासमक्ष सदरचा मुददेमाल व आरोपीस ताब्यात घेवुन पोस्टे भद्रावती येथे येवून नमुद आरोपी विरुध्द कलम ३२८, १८८,२७३ भादवि सह कलम ५९ अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ या अंतर्गत नियम व नियमाने २०११ चे कलम २६ (२) (रोमन ४), २६ (२) (१), २७(३) (डि), २७(३) (ई), ५९ (रोमन ३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment