Ads

हरदोना (बु.) येथील हत्या प्रकरणी दोघांना अटक.

राजुरा २९ जुन:-
राजुरा तालुक्यातील हरदोना (बु.) गावात भावाने भावाचा गळा दाबून हत्या केल्याची घटना दि. २८ जून रोजी रात्री नऊ वाजता घडली. प्रदीप मनोहर चीलमुले (२४) राहणार हरदोना (बु.) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी वडील मनोहर चिलमुले (५०) व भाऊ प्रफुल मनोहर चिलमुले (३०) यांना अटक केले आहे.Brother strangled brother to death.
Two arrested in Hardona (Bu.) murder case.
प्राप्त माहितीनुसार हरदोना (बु.) येथे राहणारे मनोहर चीलमुले यांना तीन मुले आहेत . २८ जून रोजी रात्री नऊ वाजता च्या दरम्यान मृतक प्रदीप हा आपल्या पत्नीसोबत भांडण करून तिला मारहाण करीत होता. त्याचा मोठा भाऊ प्रफुल चिलमुले हा त्याचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करायला गेला असता प्रदीप चीलमुले यांनी त्याला काठीने हातावर मारले. त्यामुळे त्याचे वडील मनोहर चिलमुले हे मध्यस्थी करिता गेले. प्रदीप चिलमुले हा त्या दोघांनाही ऐकत नसल्याने प्रफुल चिलमुले यांनी त्याला खाली पाडून हाताने गळा दाबून ठेवला व त्याचे वडील मनोहर चिलमुले हे घरातील दोरी आणून त्याचे हात बांधत असताना प्रफुल चीलमुले यांनी प्रदीपचा गळा दाबून ठेवल्याने प्रदीप हा अचानक बेशुद्ध पडला. त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वडील आणि भावाने दोघांनीही संगणमत करून प्रदीप चीलमुले यांचा गळा दाबून खून केल्याने राजुरा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ३०५/२०२५ कलम १०३(१),३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला असून दोघांना अटक केली आहे. पुढील तपास राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते , पांडुरंग हाके, पोलिस अमलदार किशोर तुमराम , शफीक शेख , महेश बोलगोडवार, शरद राठोड, आनंद मोरे , राजुरा पोलिस स्टेशन चे स्थानीक गुन्हे शोध पथक करित आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment