Ads

वृद्धास ट्रकने चिरडले.

राजुरा ३० जुन :-
मुलीला बाळंतपणासाठी भुरकुंडा (बुज.) येथून राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास आलेल्या दौलत जंगु कुळमेथे ह्या ६५ वर्षीय वृद्धाच्या अंगावरून ट्रक गेल्याने इसमाचा मृत्यु झाल्याची हृदयद्रावक घटना राजुरा उपजिल्हा रुग्णालयासमोर ३० जुन रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार दौलत कुळमेथे हा आपल्या मुलीला बाळंतपणासाठी पत्नी सोबत राजुरा उपजिल्हा रुग्णालयात आला होता. दरम्यान मुलीला रुग्णालयात दाखल करून चहा पिण्याच्या उद्देशाने तो रुग्णालयाबाहेर आला मात्र नेमक्या त्याच वेळी काळ बनुन आलेल्या MH ४० AK ०६५९ क्रमांकाच्या ट्रकने त्याला अक्षरशः चिरडल्याने त्याचा मृत्यु झाला. नव्या जीवाच्या आगमनाच्या हेतुने आलेल्या वृद्धाचा जीव गेला ह्यामुळे आजा गेला नातु झाला ह्या ग्रामीण म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय आला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार सदर इसम उपजिल्हा रुग्णालयाच्या निकासी द्वारातून बाहेर निघत होता मात्र तिथे ग्रामीण भागातील प्रवाशांना नेण्यासाठी अवैधपणे तसेच अस्ताव्यस्त रीतीने ऑटो उभे असल्याने सदर व्यक्तीला रस्त्यावरून येणारी ट्रक दिसली नाही व तो थेट रस्त्यावर आला. अचानकपणे इसम समोर आल्याने ट्रक चालक त्याला वाचविण्यात अपयशी ठरला व ट्रकचे चाक इसमाच्या पोटावरून गेल्याने त्याचा दवाखान्यात नेल्यावर काही मिनिटातच मृत्यु झाला.
राजुरा शहर अतिक्रमणाच्या विळख्यात असुन शहराला कुठेही वाहनतळ नाही. ऑटो चालकांची मग्रुरी, कुठेही ऑटो उभे करणे तसेच शहरातील नव्वद टक्के व्यापारी प्रतिष्ठानांनी दुकानासमोर पार्किंगसाठी जागा न सोडल्याने नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने मुख्य मार्गाचा अर्धा भाग जणु वाहनतळच झाल्याचे चित्र आहे. अशातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होत असल्याने तसेच महामार्गाच्या कडेला गट्टू लावण्याचे काम सुरू होणार असल्याने काढलेले अतिक्रमण पुन्हा उभे राहणे सुरू झाले असुन अपघातांची शक्यता वाढली आहे मात्र ह्या बाबीकडे नगरपालिका प्रशासन, पोलिस विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे प्राण संकटात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment