चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशी संख्येत वाढ करून महसुलात वाढ करण्याच्या दृष्टीने व प्रवाशांना आगाऊ आरक्षण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी उद्देशाने कमी गर्दीच्या हंगामात 151 किमी अंतरापेक्षा जास्त अंतराकरिता आगाऊ आरक्षण करणा-या प्रवाशांस प्रवास भाड्याच्या 15 टक्के सुट देण्यात येणार आहे. ही योजना दि.1 जुलैपासून सुरू होणार आहे.
रा.प. महामंडळाने प्रवाशीभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने नवनवीन उपक्रम राबवून प्रवाशांना सुलभ, माफक व अपघात विरहित सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असते. त्याचाच भाग म्हणून कमी गर्दीच्या हंगामात आगाऊ आरक्षण करून प्रवास करणा-या प्रवाशांना (कोणतीही सवलत नसलेले प्रवाशी) तिकीट दरात सरसकट 15% सवलत योजना सुरु करण्यात येत आहे. सदर सवलत रा.प. महामंडळातील सर्व प्रकारच्या सेवेकरिता लागू असून, आरक्षणाचे प्रमाण वाढल्यास अतिरिक्त बसेसचे नियोजन करणे, रा.प. सेवेची गुणवत्ता सुधारण्यास रा.प. महामंडळास मदत होवून प्रवाशांच्या सेवेत सुधारणा करण्यास मदत होईल. सदरची सवलत हि कोणतीही सवलत नसलेल्या (पूर्ण तिकीटधारी) सर्वसाधारण प्रवाशांकरिता आहे.
तिकिटांच्या आरक्षणाची सोय हि मोबाईल अप वर, रा.प. महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळावर तसेच चंद्रपूर बसस्थानकावरील केंद्रावर उपलब्ध आहेत. सदर सवलतीचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा.
स्मिता सुतवणे, विभागीय नियंत्रक, रा.प.म.चंद्रपूर
0 comments:
Post a Comment