Ads

भद्रावती नगर परिषद कार्यालयातील साहित्याची जप्ती.

जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
आठवडी बाजारासाठी भाडेतत्वावर दिलेल्या खासगी जमिनीचा जवळपास ६६ लक्ष रुपये किराया जमिनमालकाला वेळोवेळी मागणी करुनही व योग्य संधी देऊनही चुकता न करण्यात आल्याने जमिनमालकाने याविषयी वरोरा न्यायालयात दाद मागीतली व केस जिंकली.त्यानुसार न्यायालयाने दिलेल्या जप्तीच्या अधिकारानुसार जमिनमालकाने जप्तीची कारवाई करीत भाडे वसुलीसाठी नगर परिषद कार्यालयातील अनेक साहित्य जप्त केले.
Seizure of materials from Bhadravati Municipal Council office.
जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा लिलाव करुन थकलेले भाडे वसुल करण्यात येईल असे जमिनमालकाकडुन सांगण्यात आले.आठवडी बाजारासाठी शहरातील राजु गुंडावार, संजय गुंडावार व किशोर गुंडावार यांची ३० हजार ०३३ फुट जमीन २०१८ मध्ये भद्रावती नगरपरिषदने ६६ हजार रुपये प्रतीमहिणा भाडेतत्वावर घेतली होती.प्रारंभी काही महिने भाडे चकते करण्यात आल्यानंतर नगरपरिषदेकडून पुढील भाडे थकीत करण्यात आले.थकीत भाड्याची जवळपास ६६ लक्ष एवढी रक्कम थकीत झाली.या रकमेची गुंडावार यांनी नगरपरिषद कार्यालयाकडे अनेकदा मागणी केली व त्यासाठी पुरेशी संधिही दिली.मात्र नगरपरिषदेतर्फे सदर रक्कम चुकती करण्यात न आल्याने गुंडावार यांनी याविरोधात वरोरा येथील दिवानी न्यायालयात खटला दाखल केला.या खटल्याचा निकाल न्यायालयाने गुंडावार यांच्या बाजुने देत.रक्कम वसुलीसाठी जप्तीचे अधिकार गुंडावर यांना दिले.न्यायालयाच्या आदेशानुसार गुंडावार यांनी दिनांक ३० ला नगर परीषद कार्यालयात जाऊन जप्तीची कारवाई सुरु केली.या जप्ती अंतर्गत कार्यालयातील सोफा,खुर्च्या यासह विविध साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे भद्रावती नगरपरिषदेची लक्तरे वेशीला टांगली गेली आहे.
नगर परीषदे जवळ एकरकमी रक्कम चुकती करण्यास पुरेसा पैसा नाही.ही रक्कम पाच टप्यांमधे चुकती करण्याचा प्रस्ताव गुंडावार यांना देण्यात आला.मात्र त्यांनी तो मान्य न करता जप्तीची कारवाई केली.
मुख्याधिकारी
विशाखा शेळकी.
भद्रावती नगर परिषद.
जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा लिलाव करुन भाड्याची रक्कम जप्त करण्यात येईल.वसुली पुर्ण न झाल्यास आणखी साहित्य जप्त करण्यात येईल.
संजय गुंडावार
जमिनमालक
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment