जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
काही दिवसांपूर्वी चंदनखेडा परिसरात महसूल विभागातर्फे जप्त करण्यात आलेल्या वीस ब्रास वाळू साठ्याचे वितरण तहसील कार्यालयाद्वारे चंदनखेडा येथील गरजू घरकुल लाभार्थ्यांना करण्यात आले.
Seized illegal sand deposits distributed to Gharkul beneficiaries.
यावेळी चंदनखेडा येथील सरपंच नयन जांभुळे, मंडळ अधिकारी भोयर, ग्राम महसूल अधिकारी गीते आदी उपस्थित होते. जप्त करण्यात आलेला रेतीसाठा घरकुल लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावा अशी मागणी सरपंच नयन जांभुळे यांनी केली होती.तालुक्यातील रेती घाट बंद असल्याने गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने गावातील अनेक घरकुलांचे काम खोळंबले होते. हा वाळूसाठा वितरित करण्यात आल्याने काही अंशी घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे अजून काही ठिकाणी वाळू साठा असल्याने पंचनामा करून रेतीसाठा घरकुल लाभार्थ्यांना देण्यातयेईल असेही सरपंच यांनी सांगितले.या घरकुल लाभार्थ्यांना आणखी वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच नयन जांभुळे यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment