ब्रम्हपुरी:-सण २०१७ मध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा चकबोधली अॅसीड हल्लातील आरोपीला सत्र न्यायालयाने दि. २१/०५/२०२२ रोजी जन्मठेपेची शिक्षा देवुन ३०,०००/- आर्थिक दंड दिलेला आहे.
दिनांक २९/११/२०१७ रोजी मौजा चकबोथली येथील आरोपी नामे अमोल किसन उर्फ कृष्णाराव चौधरी, वय २२ वर्ष याने फिर्यादी हिला शारीरीक सुखाची मागणी केली असता फिर्यादीने नकार दिला. परत पुन्हा आरोपीने मित्राचे मोबाईल वरून फोन करून शारीरीक सुख न दिल्यास मारण्याची धमकी दिली होती. सदर तारखेला फिर्यादी हि आपल्या मुलांसोबत रात्रौ घरात झोपलो असतांना आरोपीने घरात प्रवेश करून फिर्यादी व तिच्या मुलाचे अंगावर ज्वलनशिल पदार्थ (अॅसीड) टाकुन जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमीचे बयाण व मेडीकल रिपोर्ट वरुन पो.स्टे. ब्रम्हपुरी येथे १९३४/२०१७ कलम ३०७,३२६(अ) ४५० भादंवि सहकलम ३(९). १२ अनु.जा.ज कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले. सदर गुन्ह्यातील आरोपी अमोल चौधरी व्यास अटक करण्यात आली. सदर प्रकरणात संपरीक्षेअती मा. जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस अॅसीड हल्लाच्या गुन्हयात दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा देवुन ३०,०००/- रु आर्थिक दंड दिलेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी श्री प्रशांत परदेशी साहेब यांनी केलेला असुन सध्याचे कोर्ट पैरवी अधिकारी पो हवा रामदास कोरे व.न.४१४ पो.स्टे. ब्रम्हपुरी यांनी दोषसिध्दीसाठी मोलाचे सहयोग केलेले आहे.
0 comments:
Post a Comment