चंद्रपुर :- कळमना येथील पेपरमिलच्या बांबू डेपोला लागलेली आग अद्यापही पूर्णतः आटोक्यात आलेली नाही, या भागात वारा सूरु आहे. त्यामुळे डेपो लगतचे जंगल आणि मानवी वस्तीवरचा धोका पुर्णत: टळलेला नाही. त्यामुळे सतर्क रहा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच या घटनेच्या गांभिर्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी दुरध्वनी वरुन संपर्क साधून त्यांना अवगत केले आहे. आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचीही भेट घेत आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या आहे.
आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी कळमना येथील जळालेल्या बांबु डेपोची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार, राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता बोबडे, सेव्ह फॉरेस्ट संस्थाचे अध्यक्ष सतिश नाईक, विक्रम पंडित, रोहित पंदिलवार, यंग चांदा ब्रिगेडचे शहर युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, राम जंगम, तिरुपती कलगुरुवार यांच्यासह पेपरमिलच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
काल कळमना येथील पेपरमिलच्या बांबु डेपोला लागलेल्या आगीत करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. पेपरमिलच्या कळमना येथील बांबू डेपोला लागलेली आग वेळेत नियंत्रणात आणण्यात पेपर मील येथील व्यवस्थापनाला अपयश आले. अश्या परिस्थितीशी निपटण्यासाठी येथे कोणतीही उपाययोजना नव्हती परिणामी आग पसरली यात एक पेट्रोलपंपही जळाला ही घटना पेपर मिल प्रशासनाचा बेसावधपणा उघळ करणारी आहे. त्यामूळे या प्रकरणाची चौकशी करून पेपर मिल प्रशासनावर कारवाही करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती.
दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सदर आगीवर अद्यापही पूर्णत: नियत्रंण मिळविण्यात आलेले नसल्याचे दिसुन आले. रस्त्यालगतच्या बांबुच्या राखेतुन आगीचे लोट निघत आहे. या भागात वारा सुरु आहे. त्यामूळे आग लगतच्या जंगलात पसरण्याची मोठी भिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्याच्या दुस-या कडेला बांबुचा मोठा साठा ठेवण्यात आला आहे. आग या बांबुसाठ्या पर्यंत पोहचली तर लगतच्या लोकवस्तीलाही धोका निर्माण होण्याची शक्यता. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता सदर आग विझविण्याचे युध्द पातळीवर काम करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे. जंगलालगत पेटत असलेला बांबुसाठा विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करुन या भागात सतत पाण्याच्या फवारा मारत ठेवण्याच्या सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दुरध्वनीवरुन माहिती देत प्रशासनाला योग्य सुचना करण्याची मागणी केली आहे. त्यांनतर आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचीही भेट घेत त्यांना येथील मन्युषबळ वाढवत आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करण्याच्या सुचना केल्या आहे. तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी दुरध्वनी वरुन संपर्क करुन दिला असून मुख्यमंत्री यांनी या सर्व प्रकरणाची माहिती जाणुन घेतली आहे.
0 comments:
Post a Comment