चंद्रपूर :-ओबीसी आरक्षण जाण्यामागचे श्रेय आघाडी सरकारलाच जाईल असे वक्तव्य भाजपा ओबीसी मोर्चा युवानेते महेश कोलावार यांनी केले आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात OBC Reservation महेश कोलावार यांनी म्हणाले की ज्या समाजाचा सगळ्यात जास्त मतदान होतो अश्या समाजाच्या आरक्षणाशिवाय निवडणूका घेणे हे सरकारला उचित नाही हा सरसकट ओबीसी समाजावर केलेला अन्याय आहे.खरच सरकारला ओबीसी समाजाची कदर असेल तर मागास वर्ग आयोग गठीत करुन त्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा Empirical data न्यायालयात सादर करुन ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत मिळवून आणावा.त्यानंतर ओबीसी समाजाचे आरक्षण गृहित धरुनच निवडणूका जाहीर कराव्या.
कारण दोन वर्षापूर्वी म्हणजेच १३ डिसेंबर २०१९ ला न्यायालयानी निर्देश दिले होते की राज्यात मागासवर्ग आयोग गठित करून त्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा संकलित करुन न्यायालयात सादर करावा पण या आघाडी सरकारनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केला.दोन वर्ष केवळ विनाकारणीभूत वक्तव्य व खोटे आरोप- प्रत्यारोप करत जनतेला दिशाभूल करुन आता माञ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीतून दूर सारले आहे.ही अतिशय अन्यायकारक बाब असून या सरकारचा आम्ही भाजपा ओबीसी मोर्चा वतीने जाहीरपणे निषेध करतो असे वक्तव्य महेश कोलावार यांनी केले.
0 comments:
Post a Comment