सावली( प्रतिनिधी ):- राज्याचे बहुजन कल्याण,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांचे कडून लोंढोली येथील आजारी महिलेला तत्काळ आर्थिक मदत करण्यात आली
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संजय गांधी निराधार कमिटी सावलीचे सदस्य, तथा लोंढोली ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री दिलीप लटारे यांनी नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क करून नामे मायाबाई राजू ठाकूर या महिलेच्या तब्बेती विषयी माहिती दिली.

मायाबाई ठाकूर या अनेक दिवसांपासून आजारी असून त्यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यातआले होते ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप लटारे यांचे लक्ष्यात सदर बाब येताच त्यांनी तात्काळ सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे जाऊन आर्थिक मदत पोहचविली
दरम्यान सौ मायाबाई राजू ठाकूर यांची परिस्थिती अत्यंत सामान्य असून त्यांना दवाखान्यात जाऊन मदत केल्यामुळे आनंद झाला असे उदगार मायाबाई यांचे कुटूंबियांना व्यक्त केले सदर आर्थिक मदत लोंढोली ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप पाटील लटारे यांचे हस्ते देण्यात आली
नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांचे जनसेवाचा एक पैलू यानिमित्ताने जनतेला दिसुन आला
0 comments:
Post a Comment