घुग्घुस :- शहरातील राजीव रतन चौकात आर.के. मथानी या कंपनी तर्फे उड्डाण पुलाचे निर्माण कार्य सुरू करण्यात आलेले आहे.
मात्र या कंपनीच्या बोगसपणे व ढिसाळ नियोजनामुळे राजीव रतन चौक हा अपघाताचा हॉट स्पॉट ठरला आहे.
कंपनी तर्फे पर्यायी रस्ता, रुग्णवाहिका, वॉटर टँकर, स्वच्छता कर्मी, सुरक्षा रक्षक नियुक्ती तसेच वेस्ट सिमेंट काँक्रिट मटेरियल घुग्घुस - म्हातारदेवी रस्त्यावर टाकण्यात यावे या करिता घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली कंपनी कार्यालयावर कार्यकर्त्या सह धडकले होते.
एका आठवड्यात जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर कंपनीचे काम बंद पाडण्याचा इशारा काँग्रेस अध्यक्षाने केले होता.
त्या मागणीची दखल घेत कंपनीने रस्त्यावरील खड्डे बुजिण्याचे कार्य सुरू केले असून सदर कार्य हे नागरिकांना दिलासा देणारा ठरला आहे.
0 comments:
Post a Comment