ब्रह्मपुरी :- ब्रह्मपुरी शहरातील फाशी चौक येथे राहणाऱ्या साहिल उर्फ थंडी अमित मोटघरे यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकून त्याच्या घरातून ४८४.५२ ग्राम गांजा अं. कि १०००-/ रु. जप्त केला आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली.Illegal cannabis dealer handcuffed by police in Brahmapuri
दि. ९/५/२०२२ रोजी १३.५० वा. दरम्यान ब्रह्मपुरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली रिकाँर्डवरील सराईत गुन्हेगार साहिल उर्फ थंडी अमित मोटघरे रा. फाशी चौक ब्रह्मपुरी याचे राहते घरी अवैधरित्या गांजा ठेवून आहे त्यावरून पोलिसांनी पंचासह त्याचे घरी छापा टाकला असता त्याचे घरात पिशवीत लपवून ठेवलेला ४८.५२ ग्राम गांजा अं.कि १०००-/रु पंचनामा कारवाई करून जप्त करण्यात आला आरोपीला ताब्यात घेऊन ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनला आणण्यात आले त्याच्यावर अप. क्र २२५/२२ कलम २० (ब) एन.डि.पी.एस अँक्ट सन १९८५ अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आले सदरची कारवाई श्री मल्लिकार्जुन इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी मुल, अतिरिक्त कारभार ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी चे ठाणेदार रोशन यादव,सपोनी परशांत ठवरे,नापो/ मुकेश गजबे,पोशी / अजय नागोसे, यांनी केलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे, करत आहेत.
0 comments:
Post a Comment