चंद्रपूर :- बाबुपेठ मधील माहेर घर परिसरात मोठ्या नाल्याचे काम अर्धवट केल्याने तेथील नागरिकांच्या घरामध्ये नाल्याने वाहत आलेली घाण जमा होत आहे अशी तक्रार आम आदमी पार्टी बाबुपेठ च्या कार्यालयांमध्ये आली होती त्या अनुषंगाने आठ महिने अगोदर मनपा आयुक्त यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते, परंतू काही दिवसांनी पाठपुरावा केला असता सबंधित अधिकार्याकडून ईस्टिमेट काढण्यात आलेला आहे, ठेकेदाराकडून लवकरात लवकर काम सुरू होईल असे पोकळ आश्वासन देण्यात आले परंतु पाऊसाळा जेमतेम येत असून, अजून पर्यंत काम सुरू झालेले नाही जर पावसाळा आला तर परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल.
याकरिता मनपा प्रशासनाला जाब विचारणे करिता आम आदमी पार्टी चंद्रपूर टीमने आयुक्तांची भेट घेतली आणि तात्काळ सहा दिवसांत नाल्याचे काम सुरू करावे अन्यथा जनतेला सोबत घेऊन घाणीपासून जनतेला होणारा त्रासाची जाणीव करून देण्यासाठी ती घाण अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये टाकू असा अल्टिमेटम राजु भाऊ कूडे यांनी मनपा प्रशासनाला दिला.
यावेळेस आपचे शहर सचिव राजू भाऊ कुडे, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप भाऊ तेलतुंबडे, महिला शहर संघटन मंत्री सुजाता ताई बोदेले,
श्री. सय्यद अश्रफ शहर अध्यक्ष अल्पसंख्याक, श्री. चंदु भाऊ माडूरवार शहर उपाध्यक्ष युथ विंग, वरिष्ठ कार्यकर्ते डॉ. सलीम तुकडी जी, माजी सैनिक सुनील सतभय्या जी, श्री. कालिदास ओरके कोषाध्यक्ष, सागर बोबडे,अजय कुमार बाथव, नितिन कामतावर, महेश सिंह पाजी, विनोद भाऊ रेब्बावार, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment