चंद्रपूर:-ज्या नाभिक समाज बांधवाने कोणतेही स्वार्थ न बाळगता समाजाच्या कार्यासाठी आपल्या जीवनातला अमूल्य वेळ समाजासाठी दिला.समाजाच्या गोर गरीब बांधवांसाठी खर्ची घातला अशा समाज बांधला मानाचा आदर्श नाभिक समाज सेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित सर्व शाखीय उपवर बंधू परिचय सोहळा ,विदर्भस्तरीय समाज मेळावा तथा भव्य असा फॅशन शोचे आयोजन प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृत येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा सुधिरभाऊ मुनगंटीवार लोकलेखा समिती अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री नियोजन व वन मंत्री ,अध्यक्ष रविभाऊ बेलपत्रे महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेश अध्यक्ष तसेच मा अरुण जमदाडे महाराष्ट्र प्रदेश सचिव,सुभाषभाऊ गुंडलवार नाभिक जनकल्याण अध्यक्ष नागपूर,माधुरी पारपल्लीवर प्रदेश महिला प्रमुख कोल्हापूर तसेच रविंद्र येसेकर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते मा राजा वेमुला ऊर्जानगर यांना २०२२ चा आदर्श नाभिक समाज सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राजा वेमुला हे महाराष्ट्र अंनिस शाखा ऊर्जानगर अध्यक्ष असून महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार संघटना सिटीपीएस चे मुख्य संघटक आहेत तसेच वसाहतीतील विविध सामाजिक संस्थेत त्यांचे योगदान आहे.या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस मा नरेंद्र रहाटे,विक्की राठोड,नारायण चव्हाण,सुभाष शेडमाके,देवराव कोंडेकर तसेच महा अंनिस व मित्र परिवाराच्या वतीने सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

0 comments:
Post a Comment