भद्रावती (तालुका प्रतिनिधी) :-भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा क्षेत्रातील लिलाव न झालेल्या एका घाटावर रेती तस्करी Sand Mafia करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांच्या गाडीला मारण्याच्या हेतूने ट्रॅक्टरने मागाहून जोरदार धडक देऊन प्राणघातक हल्लाlethal attack केल्याची घटना दि.२९ मे ला सकाळला १० च्या सुमारास घडली.धडक एव्हढी गंभीर होती की तहसीलदार यांचे वाहन सुमारे २० फूट अंतरा पर्यन्त फरफटत नेलेे त्यानंतर ट्रॅक्टर समोर जाऊन पलटी झाले.या घटनेची माहिती मिळताच शेगांव व भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
यात तहसीलदार डॉ. अनिकेत सोनवणे यांच्या उजवा हाताला गंभीर दुखापत झाली असून सहकारी नायब तहसीलदार शंकर भांदक्कर विलोडा तलाठी कैलास पुसनाके , तलाठी श्रीकांत गीते सुदैवाने बचावले.
विलास पांडूरंग भागवत वय ४o वर्ष राहनार चंदनखेडा असे ट्रॅक्टर चालक- मालकाचे नाव आहे . हा टॅक्टर क्रमांक एम एच ३४ बी जी २३४३ यांनी रेती याघाटावरून रेती चोरून नेत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार डॉ.सोनवणे यांना मिळाली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या वाहनांनी चंदनखेडा परिसर कारवाईसाठी गाठले.तेव्हा त्यांनी त्यास ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले. त्याने ट्रॅक्टर थांबविले व टॅक्टर चालक व मजूरांना खाली उतरविले व स्वतः भागवत यांनी टॅक्टर चे स्टेरींग हातात घेवून तहसीलदार यांच्या गाडीला मागाहून जोरदार धडक दिली.यात ते वाहन वीस फुटापर्यत फरफटत नेले यात तहसीलदार यांच्या उजव्या हाताला गांभीर दुखापत झाली त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे . नायब तहसीलदार शंकर भांदक्कर यांच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे .
0 comments:
Post a Comment