सिंदेवाही प्रतीनिधी :- शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील विनायक नगर येथील लोकांना सहकारी राईस मिल च्या मागील बाजूस निघणाऱ्या त्या धुळामुळे त्रास होत आहे.Co-operative Rice Mill is inviting various diseases ... याचे 2018 पासून मंत्री तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन सुद्धा दिले. पण कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. तसेच विनायक नगर येथील शेकडो नागरिकांना कोणीही आजवर न्याय दिला नाही ते आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत .Waiting for justice
सदर निघणाऱ्या धूळ मुळे श्वसनाद्वारे मानवी आरोग्य धोक्यात येत असून त्यामुळे परिसरातील शुद्ध हवा देखील हळूहळू प्रदूषितAir Pollution
व्हायला लागली आहे. त्यामुळे विनायक नगर येथील नागरिकांना जीवघेण्या आजारा सोबत इतर आजार जडण्याची शक्यता (विनायक नगर येथील नागरिकांकडे असलेल्या वैद्यकीय रिपोर्टनुसार )वैद्यकीय सूत्रांनी वर्तवली आहे.
तसेच ही धुर अस्थमासारख्या श्वसनाच्या आजारांना निमंत्रण देते. परिणामी असे की येथील लोकांना सर्दी, खोकला, कफ दाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी समस्या उद्भभवत आहेत. त्यामुळे आम्हाला सरकारी राईस मिल मधून निघणाऱ्या त्या धुळामुळे कोणी वाचवेल काय ? असे प्रभाग क्रमांक दोन मधील विनायक नगर येथील शेकडो नागरिकांची मागणी आहे तसेच ते अजूनही प्रतीक्षेत आहेत.
0 comments:
Post a Comment