चंद्रपूरः- इको-प्रोच्या वतीने ‘मेरा हक, साफ हवा’ अभियान राबविण्यात येत असुन, याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त यांना इको-प्रोच्या वतीने निवदेन देत शहरातिल हवा प्रदुषण व महानगरपालिकेच्या वतीने उपाययोजना करण्याची मागण्याबाबत चर्चा करण्यात आली.
आज इको-प्रो च्या शिष्टमंडळाने चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहीते यांची भेट घेत सदर निवेदन दिले, यावेळी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे, पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, सचिन धोतरे, रोशन शास्त्रकार उपस्थित होते. यापूर्वी सुद्धा सदर मागण्याचे निवेदन तत्कालीन आयुक्त विपिन मुद्दा यांना देण्यात आले होते. आज आयुक्त मोहिते यांचेसोबत शहरातिल हवा प्रदुषणाची कारणे व त्यावरील उपाययोजना बाबत चर्चा केली. शहरातील औदयोगीक प्रदुषणासोबतच शहरात धुळीचे प्रदुषण सर्वाधिक आहे. यावर सुध्दा कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले आहे. नुकतचे नोव्हे महिन्यात इको-प्रो व वातावरण फाउंडेशनच्या वतीने कुत्रीम फुफफुस लावण्यात आलेले होते. राज्यातील इतर शहराच्या तुलनेत सदर कुत्रीम फुफुस अवघ्या पाच-सहा दिवसात काळवंडले होते, हे विशेष! या उपक्रमातुन शहरातिल वायु व धुळीचे प्रदुषणावर परत शिक्कामोर्तब करण्यात आले. यांसदर्भात व्यापक कार्य करण्यासाठी इको-प्रो ने प्रजासत्ताक दिनापासुन ‘मेरा हक - साफ हवा’ अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियान अंतर्गत वेगवेगळे स्त्रोत त्याविषयी उपाययोजना करणारे यंत्रणा यांचेकडे आग्रही मागणी केली जाणार आहे. औदयोगीक प्रदुषणासोबतच महानगरापालिका क्षेत्रात प्रदुषणाची कारणे ओळखुन त्यावर उपाययोजना करण्याच्या दुष्टीने इको-प्रो तर्फे आयुक्त राजेश मोहीते यांना भेटुन निवेदन देत यावर उपाययोजनाबाबत चर्चा केली. यासाठी संस्थेच्या वतीने मागील अनेक वर्षापासुन वेगवेगळया पातळीवर मागणी, संघर्ष व न्यायालयीन लढयासोबत, आंदोलन, उपोषण सुध्दा करण्यात आले आहे. निवेदनात नमुद मुदयानुसार, शहराच्या आत मोठया प्रमाणात धुळीचे प्रदुषण असल्याने, यासाठी रोड स्विपींग मशीनचा वापर रस्ते सफाईसाठी वापर करण्यात आल्यास वाहनामुळे वांरवार रस्त्यावरील उडणारी धुळ नियत्रणात येउ शकते. शहरातील वायु प्रदुषणची तिव्रता कमी करण्यास ‘एअर प्युरीफायर टॉवर’ उभारण्याची आवश्यकता आहे. शहराच्या सभोेवताल असलेल्या कोळसा खाणी परिसरात जाळण्यात नागरीकांकडुन घरगुती शेगडी मध्ये जाळण्यात येणारा दगडी कोळसा (डोमेस्टीक कोल बर्नीग) यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास पावले उचलण्यात यावी. शहराच्या सभोवताल टायर, इलेक्ट्रीक केबल जाळण्यात येत असल्याने यामुळे प्रदुषणात भर पडत आहे यावर नियत्रंण आणणे आवश्यक आहे.
यासोबतच शहराच्या औदयोगीक क्षेत्रात प्रदुषण मापक संयत्र लावण्यात आलेले आहे, मात्र शहराची हवा गुणवत्ता अधिक खराब असल्याने, पालिका हद्दीत सुध्दा पालिकेचे स्वतःचे हवा प्रदुषण मापक संयत्र शहरात लावण्यात यावे, महानगरपालिकेच्या कचरा डेपोवर अनेकदा कचराच्या ढिगाÚयाला आग लागत असते, त्यामुळे कचरा जळाल्याने हवा प्रदुषण होत असल्याने या घटना टाळणे, शहरातिल सर्व वाहनाच्या ‘पियुसी’ सातत्याने चेक होतील याची खात्री करणे, आणि पियुसी वाहन चेक केल्यानंतरच दिली जावी यासाठी जवाबदारी निश्चीत करणे. शेवटी या सर्व वाहनामुळे शहराच्या हवा प्रदुषणाशी सरळ संबध असल्याने संबधीत विभागासोबत आवश्यक पाठपुरावा करणे. शहरात अनेक मालवाहु चारचाकी वाहने, ऑटो, छोटा हत्ती, ट्रॉली सदर वाहने कालबाहय व मोठया प्रमाणात प्रदुषण करणारी असल्याने याकडे सुध्दा महानगरपालीकेकडुन अधिक लक्ष घालणे आवश्यक आहे. रस्ताच्या दुर्तफा वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने शहरातील वार्ड-प्रभाग अंतर्गत मा. नगरसेवकांच्या मदतीने शक्य त्या रस्त्यांचा समावेश करण्यात यावा. शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या सर्वच ओपन स्पेसला, वॉल कपांउड करून तिथे वृक्षारोपन करण्यात यावे, शहरातील अशा निवडक जागा जिथे ‘मियावॉकी’ पध्दतीने वृक्षारोपन करता येईल, अशी सर्व जागा शोधुन त्यानुसार योजना आखावी असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहरातील हवेची गुणवत्ता खुपच खालावली आहे, शहरातील विवीध प्रदुषणाच्या स्त्रोतांची चर्चा नेहमीच होते, कागदोपत्री उपाययोजना आखल्या जातात मात्र त्याची अमलबंजावणी हवी तशी होत नसल्याने दिवसागणीक प्रदुषणात आणी प्रदुषणामुळे नागरीकांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सर्वसामान्य नागरीकांना प्रदुषणाचे दुष्परिणामाची कल्पनाच येत नाही कारण हे ‘स्लो पायजन’ slow poisonसारखे शरिराला आतुन आजारी करित आहे. त्यामुळे नागरीकांची हवी तशी ओरड, आक्रोश दिसुन येत नाही. मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अहवाल हवा गुणवत्ता अहवाल बघितल्यास 365 पैकी 200 पेक्षा अधिक दिवस हे सर्वाधिक प्रदुषणची असतात यावरून शहरातील हवा प्रदुषणाची गंभीरता लक्षात येईल. याकरिता एक व्यापक लढा उभारण्याच्या दुष्टीने, नागरीकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने इको-प्रो ने ‘मेरा हक! साफ हवा’ हे अभियान सुरू केल्याचे बंडु धोतरे यांनी सांगीतले आहे.
0 comments:
Post a Comment