चंद्रपूर (प्रतिनिधी) :
रामनगर पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाईत दोन कुख्यात वाहनचोरांच्या मुसक्या आवळत तब्बल ५ चोरीच्या मोटारसायकलींसह अंदाजे १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
Ramnagar Police's explosive action – 5 stolen motorcycles seized from notorious thieves
दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादी चंद्रहास अर्जुन मुन (वय ४७, रा. शामनगर, चंद्रपूर) यांनी आपली हिरो होंडा कंपनीची सी.डी. डिलक्स मोटारसायकल (क्र. एम.एच. ३४ डब्ल्यु ६७२४) बंगाली कॅम्प येथील डी.आर.सी. हेल्थ क्लबजवळ पार्क केली होती. मात्र काही वेळानंतर परतल्यावर त्यांना आपली मोटारसायकल चोरीस गेल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सदर घटनेचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. आशिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गोपनीय माहितीदारांची मदत घेतली. दरम्यान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की काही इसम चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी चंद्रपूर येथे आणले आहेत.
त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीच्या मोटारसायकलींची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
1. गोपाल जिवन मालाकार (वय ३० वर्ष, रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर)
2. आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख (वय २२ वर्ष, रा. फुटक नगर, एकता नगर, चंद्रपूर)
या दोघांकडून पोलिसांनी खालील पाच मोटारसायकली जप्त केल्या —
1. हिरो होंडा सीडी डिलक्स (क्र. MH-34/W-6724) – किंमत ₹5,000
2. होंडा अॅक्टीव्हा 6G (बिना नंबर) – किंमत ₹40,000
3. सुझुकी अॅक्सेस 125 (MH-49/AY-8592) – किंमत ₹35,000
4. हिरो स्प्लेंडर प्लस (MH-49/CN-2320) – किंमत ₹50,000
5. हिरो स्प्लेंडर प्लस (MH-34/BL-6242) – किंमत ₹30,000
एकूण मुद्देमाल : अंदाजे ₹1,60,000
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पो.नी. देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे तसेच पो.हवा. आनंद खरात, जितेंद्र आकरे, शरद कुडे, लालु यादव, बाबा नैताम, गजानन नागरे, म.पो.हवा. मनिषा मोरे, पो.अं. रविकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल पप्पुलवार, संदिप कामडी, सुरेश कोरवार, रूपेश घोरपडे व म.पो.अं. ब्ल्युटी साखरे यांनी मोलाची भूमिका बजावली.
रामनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
0 comments:
Post a Comment