जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
शेगाव... वरोरा तालुक्यातील शेगाव कृषी मंडळ कार्यालय अंतर्गत येत असलेल्या चारगाव बु. येथील शेतकरी शरद बाबुराव भोगेकर यांचे सात एकरातील धान पिकांचे परतीच्या अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झाले असून पुन्हा एकदा सोयाबीन पिकानंतर शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे...
Heavy rains cause damage to paddy crops.
 शेगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धान पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे धान पिके कापणीवर आलेले असून दोन, तीन दिवसापासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने परिसरातील हजारो हेक्टर धान पिके संकटात सापडलेली आहे..
अगोदरच ऑगस्ट, सप्टेंबर, महीन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीन पीके, पीकावर आलेल्या येलो मोजक रोगामुळे व बोगस बियाणामुळे नगदी असणारे सोयाबीन पिके नष्ट झालेली आहे चारगाव बु.येथील शेतकरी शरद भोगेकर यांचे सहा एकरातील सोयाबीन नष्ट झालेले असून पुन्हा एकदा हाताशी आलेले धान परतीच्या पावसामुळे नष्ट झाली धान पिके पूर्णपणे बांधीतीत असलेल्या दोन फूट पाण्यामध्ये भिजलेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी महादेव भोयर, अविनाश डाहुले,छगन आडकिने, अरविंद वायदुळे, अनंता भलमे, विजय ढवरे,प्रशांत सोनेकर, आदी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे...
0 comments:
Post a Comment