घुग्घुस : येथील महामिनरल & माईनींग (गुप्ता वॉशरीज) मध्ये स्थानिक वाहतूक दारांच्या वाहतूक भाडेवाढी मध्ये पंचवीस टक्के वाढ, रस्ता दुरुस्तीकरण, इंधन दरवाढ व अन्य न्यायपुर्ण
मागण्या करिता दिनांक 20 मे दुपारी 03 वाजता पासून कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.
सदर आंदोलन काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, संघटना पदाधिकारी राकेश खोब्रागडे, श्रीनिवास गोस्कुला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
वॉशरीज परिसरात वाहनांच्या रांगाच - रांग लागल्या शांती व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक बबनराव पुसाटे, उप - निरीक्षक मेघा गोखरे, यांनी पोलीस बंदोबस्त लावला व दंगा नियंत्रण तैनात केले.
21 मे रोजी सायंकाळी वॉशरिज च्या कार्यालयात कंपनी अधिकारी शशिकांत गुप्ता, सुयोग बिडलावार, संजय सरागे, काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, राष्ट्रवादी चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, कामगार नेते सैय्यद अनवर, राकेश खोब्रागडे,श्रीनिवास गोसकुला, बंटी जैस्वाल, अंगद बिराम यांच्यात संयुक्त बैठक झाली यात कंपनीने वाहतूक भाड्यात पंचवीस रुपये वाढी सह सर्व मागण्या मान्य केल्याने
चालक मालक संघटनेने आनंद व्यक्त करीत आपल्या कामाला सुरुवात केली
0 comments:
Post a Comment