बल्लारपूर :-बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथील पेपरमिल डेपोला रविवारी दि २२ मे ला दुपारी २ वाजता दरम्यान भीषण आग लागून करोडो रुपयांचे बांबू व निलगरी जळून खाक झाल्याची घटना घडली. नजीकचा पेट्रोल पंप देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीत कोट्यावधी रुपयांचा कच्चा माल जळाला.
दरम्यान माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री विकास खारगे यांना सदर घटनेची माहिती कळविली व संबंधित यंत्रणांना निर्देश देण्याची विनंती केली. तसेच जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने यांना ताबडतोब आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.पोलीस अधीक्षकांना अतिरिक्त पोलिस बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार बल्लारपूर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे येथील फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना भोजनाच्या किट्स वितरण आणि प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते श्री चंदनसिंह चंदेल , बल्लारपूर चे माजी नगराध्यक्ष श्री हरीश शर्मा , तहसीलदार श्री राईचवार, पोलीस निरीक्षक आदींची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment