Ads

बल्लारपूर पेपर मिलच्या कळमना येथील बांबू डेपोला लागली भीषण आग

बल्लारपूर :- बल्लारपूर पेपर मिलच्या कळमना - येथील बांबू व लाकूड डेपोला रविवारी दुपारी 4 वाजेदरम्यान भीषण आग लागली A Huge fire broke out, आग वाऱ्यासारखी परिसरात पसरली. kalmana Ballarpur
आगीची माहिती मिळताच बल्लारपूर पेपर मिल व नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने ती आटोक्यात आणणे अशक्य झाले. Huge fire डेपोच्या जवळ असलेल्या भारत पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ पेट्रोल पंप खाली करायला सांगितले, कर्मचारी पंपावरून तात्काळ निघाले असता काही वेळात ती आग पेट्रोल पंपाला लागली. कळमना परिसरात पेट्रोल पंपाच्या ब्लास्ट चे मोठे आवाज नागरिकांना आले. या आगीत कोट्यवधी रुपयांचे लाकूड जळून खाक झाले.
गडचादूर येथील अल्ट्राटेक, अंबुजा, राजुरा नगरपालिका, आष्टी, चंद्रपूर महानगरपालिका, एसीसी यासह जिल्हाभरातील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र आग इतकी भीषण आहे की, ती आटोक्यात आणणे अशक्य आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे आलापल्ली चंद्रपूर महामार्गावरून वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भीषण आगीची माहिती मिळताच तहसीलदार संजय राईंचवार, ठाणेदार उमेश पाटील, कोठारीचे ठाणेदार तुषार चौहान हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. आगीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची ये-जा थांबवली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा
लागल्या आहेत. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या विद्युततारा जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या गावात अंधार पसरणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment