वरोरा :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा वरोरा तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही संकल्प 2022 व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 17, 18,19, व 20 मे 2022 ला संपन्न झाले. या शिबीराला वरोरा तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयाचे 150 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
या शिबिराला उद्घाटक म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.करणजी देवतळे यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थित म्हणून अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री मा.अखिलेशजी भारतीय यांची उपस्थिती होती. व यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनीना त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर शिबिराच्या वेगवेगळ्या सत्राला सुरुवात झाली. विवेकानंद एक युगपुरुष एकपात्री प्रयोग दिपालीताई घोंगे यांनी सादर केला. या प्रयोगातून त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे लहानपणापासूनचे जीवन प्रवासाबद्दल सांगितले. यानंतर अंताक्षरी व गटश: चर्चा करण्यात आली. यानंतर शक्तीजी केराम यांनी माय मिशन, माय नेशन या विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले. व रवींद्रजी मिसाळ यांनी स्वतःची ओळख करिअरची निवड या विषयावर विद्यार्थ्यांना वेगवेगळे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. यानंतर गटश: प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज, चालू घडामोडी वर प्रश्न विचारण्यात आले. यानंतर पल्लवीताई ताजने यांनी टाईम मॅनेजमेंट बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. पंकज काकडे सर यांनी करियर गायडन्स या विषयांवर मार्गदर्शन केले. टीम बिल्डिंग (एक अनुभूती ) हे खेळ खेळण्यात आले. व मा.डॉ. संदिपजी लांजेवार यांनी वकृत्व, कर्तृत्व व नेतृत्व एक कला या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अशा वेगवेगळ्या सत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या शिबीराला विदर्भातील चिमूर येथील फेमस युट्युबर चिमूर का छोकरा मा. आशिष बोबडे यांची सुद्धा उपस्थित होती. यानंतर समारोपीय सत्राला सुरुवात झाली . या मध्ये प्रा. धर्मेंद्र मुनघाटे सर यांनी विद्यार्थ्यांनशी हितगूज साधली व या शिबिराचे महत्त्व पटवून सांगितले. शिबिर संयोजकांनी शिबिरात झालेले कार्यक्रम उपक्रम बद्दल माहिती दिली. व उत्कृष्ट शिबिरार्थीची घोषणा केली. यामध्ये उत्कृष्ट शिबिरार्थी विद्यार्थी म्हणून निखील सालवटकर यांची निवड करण्यात आली तर उत्कृष्ट शिबिरार्थी विद्यार्थिनी म्हणून दीपिका आगलावे, गौरी येरणे, लक्ष्मी जीवतोडे यांची निवड करण्यात आली. यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिराचे समारोप अभाविप जिल्हा संघटनमंत्री मा.अमितजी पटले यांनी केले. व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकिल शेख यांनी केले व आभार नगर मंत्री छकुली पोटे यांनी मानले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा. धनंजय पारके गणेश नक्षिणे, शकिल शेख, छकुली पोटे, आशिष भट आदीकार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment