भद्रावती (तालुका प्रतिनिधी ):-दिनांक ३०/०५/२०२२ रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (कोअर) क्षेत्रातील ताडोबा | वनपरिक्षेत्राचे अधिकारी / कर्मचारी गस्तीवर असताना भानुसखिंडी नियतक्षेत्रातील भानुसखिंडी संरक्षीत वनात आग सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांनंतर सदर अधिकारी/कर्मचारी हे वेळीच घटनास्थळी पोहचल्याने वेळीच आगीवर नियंतंत्रण मिळविण्यात आले. त्यानंतर आग लावलेल्या अज्ञात व्यक्तीची शोध मोहीम हाती घेऊन तपास सुरू केला असता मौजा वायगाव (भोयर) येथील किसन सदाशिव जांभुळे वय ५८ वर्षे यांनी त्यांचे अतिक्रमन केलेल्या शेतात धुरे/ बांध जाळण्याकरीता आग लावलेली होती. परंतु आगीने रौद्र रूप घेतल्याने त्यांचे शेताला लागुन असलेल्या भानुसखिंडी नियतक्षेत्रातील भानुसखिंडी संरक्षीत वनातील एकुण २४ हेक्टर जंगल जळालेले आहे.
सदर आरोपी यांना शेतातील धुरे / बांध जाळत असतांना संबंधीत कर्मचारी यांना कळविण्याबाबत या कार्यालयाचे पत्र क्रमांक ६६२ दिनांक २२/०३/२०२२ अन्वये पत्राद्वारे कळविण्यात आलेले होते. परंतु आरोपीने हेतुपरस्पर जंगलाला आग लावुन वन व वन्यजीवांचे आश्रयस्थान नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे संबधीत आरोपी यांचे विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३० नुसार पि. ओ. आर. क्रमांक ०९७५५/२४३८५१ दिनांक ३१/०५/२०२२ अन्वये वनगुन्हा नोंदवून सदर आरोपीस दिनांक ३१/०५/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजताचे सुमारास अटक करण्यात आली..
सदर घटनेची एकंदरीत चौकशी श्री सतीश शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी ताडोबा, एस.एम. नन्नावरे क्षेत्र सहाय्यक, सोनेगांव, श्री व्हि. डी. कामटकर, क्षेत्र सहाय्यक काटेझरी व श्पी.आर. कोसुरकर वनरक्षक व इतर कर्मचारी यांनी मिळुन केली. पुढील तपास खोरे साहेब सहाय्यक वनसंरक्षक यांचा मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0 comments:
Post a Comment