Ads

प्रहार संघटनेच्या दणक्याने अवैध वाळू तस्करीतील चार टिप्पर जप्त.

ब्रम्हपुरी :-प्रहार संघटने तर्फे वाळू तस्करीवर कारवाई करण्याबाबत दिलेल्या निवेदनाची कुठलीही दखल घेतली न गेल्याने मंगळवार रात्रौ अकरा वाजता सुमारास ब्रम्हपुरीच्या प्रहार संघटने कडून धडक कारवाई करण्यात येत अवैध वाळू तस्करीतील चार टिप्पर वाहण चालकाकडे कुठलीही रॉयल्टी नसल्याने दोन टिप्पर थेट पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे जमा केले तर दोन टिप्पर चालक, प्रशासनाच्या कारवाईला उशिरा झाल्याने टिप्पर सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले.Four tippers involved in illegal sand smuggling seized by Prahar organization
प्रहार संघटने कडून मंगळवारला रात्रौ च्या दरम्यान झालेल्या धाडसी कारवाई ने निद्रावस्तेत असलेल्या प्रशासनाची चांगलीच झोप मोड झाल्याचे सदर कारवाई वरून दिसून येत आहे अकरा वाजता पकडण्यात आलेल्या वाहणांना कारवाई साठी महसूल व पोलीस प्रशासनाला वारंवार सूचना दिली असता स्थानिक प्रशासनाचे कुठलेली सहकार्य लाभत नसल्याने प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना फोन द्वारे माहिती देतं मदत मागितल्याने स्थानिक पोलीस प्रशासन खळबळून जागा झाला व तब्बल एक ते दीड तासानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तो पर्यंत दोन टिप्पर एक MH 40 AK 4607 दुसरा MH 40 AK 0919 वाहणाचे चालक घटनास्थळावर वाहन सोडून देतं पळून जाण्यात यशस्वी झाले तर दोन टिप्पर चालकांनी वाहन पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे जमा केले आहे.

पळून गेलेल्या चालकांचे वाहन घटनास्थळी असल्याने पोलीस प्रशासनाच्या देखरेखी खाली बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. सदर घटने अगोदर सुद्धा सामान्य नागरिकांनी अश्या कारवाह्या रस्त्यावर उतरत केले असल्याने ब्रम्हपुरी तालुक्यात खुलेआम वाळू तस्करी होतं असल्याचे उघड सत्य जिल्ह्याच्या पटलावर स्पष्ट झाले आहे तर लाचखोर अधिकारी आर्थिक लाभासाठी वाळू तस्करीला मोकळीक देतं असल्याने भविष्यात पुन्हा साधारण जनता रस्त्यावर उतरत अशा गैर प्रकाराला आळा घालत बंदोबस्त करत असल्याने प्रशासनाची नाचक्की होतं असल्याने सर्वत्र नागरिकांच्या चर्चेचा विषय होतं आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment