चंद्रपुर :-अनधिकृत बांधकाम असलेल्या गाळ्यामध्ये नियम डावलून स्थानांतरीत करण्यात आलेल्या नागपूर रोड वरील डॉ.राम भारत यांच्या दवाखान्या शेजारील देशी दारू दुकानाचे विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांविरुद्ध जिल्हा प्रशासन व पोलिसांनी आज 2 जून रोजी सकाळी 10 चे दरम्यान दडपशाहीचा वापर करून महिलांचे आंदोलन चिरडण्याची संतापजनक कारवाई केली.आंदोलनाचा मंडप पोलिसांनी उखडून फेकला.
जनविकास सेना महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा बोबडे, युवा आघाडीचे अक्षय येरगुडे तसेच बेबीताई राठोड़,वैशाली मानकर, राखी सातपुते, निरगुना लोणारे, कैसलाबाई मानकर, प्रतिमा भोपारे, पुष्पा तोडासे, रिणल सातपुते , वच्छला पंढरे इत्याद
दुकानाविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांना अटक केली.नियम डावलून दुकानाचे वाटप केल्याचे जनविकास सेनेने पुराव्यासह सिध्द केले आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी या दुकानाचे स्थालांतरण रद्द करणे गरजेचे असताना अवैध दुकान सुरू करण्यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाने पूर्ण ताकद लावली.जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाच्या या दडपशाही विरोधात सर्व स्तरावरून संताप व्यक्त केल्या जात आहे. बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाचा प्रयत्न हाणून पाडू अशी प्रतिक्रिया यावेळी जनविकास सेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा बोबडे यांनी दिली.
पैशाच्या हव्यासापायी
जिल्हा प्रशासन व पोलिस विभागचे अवैध व्यवसायाला खुले पाठबळ,लोकप्रतिनिधींचाही आशिर्वाद
जिल्हा प्रशासन व पोलिस विभाग अवैध धंद्यांना खुलेआम पाठबळ देत आहे.काही लोकप्रतिनिधींची या अवैध व्यवसायात प्रत्यक्ष भागीदारी आहे.जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस मुख्यालय अवैध धद्यांचा अड्डा झालेला आहे.कोळसा,रेती,दारू इत्यादींच्या अवैध व्यवसायामुळे जिल्ह्य़ात अनेक खून झाले.कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली.परंतु अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्या ऐवजी संरक्षण देण्याचे काम पोलिस व जिल्हा प्रशासन करीत आहेत.पैशाच्या हव्यासापायी चंद्रपूर शहर व जिल्ह्याचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करण्यात येत असुन गुंडगिरीला संरक्षण देण्यात येत असल्याचा आरोप जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला.तसेच अवैध व्यवसायातून करोडो रूपयांची माया गोळा करणाऱ्या एसपी,कलेक्टरसह अनेक भ्रष्ट अधिकार्यांची 'ईडी' ED कडे तक्रार करणार असल्याचे सुध्दा देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.Protection of illegal liquor shops ... Repression against agitating women

0 comments:
Post a Comment