घुग्घुस :- घुग्घुस पासून काही अंतरावर असलेल्या नकोडा वॉर्ड क्रमांक 2 मस्जिद कॉम्प्लेक्सजवळ एमएच 6 ए एन 7692 क्रमांकाच्या पांढऱ्या कारमध्ये गोविंदा रघुनाथ लोणेरे वय 45 यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
The body of the sweeper was found in the car
मृतक हा ग्रामपंचायतीत सफाई कामगार म्हणून कामाला होता. मयत चार दिवसांपासून बेपत्ता होता, याची तक्रार नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात दिली. घुग्गुस पोलीस त्याचा शोध घेत होते. मशिदीच्या आवारात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास नागरिकांनी तपासणी केली असता, मशिदीजवळ उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून दुर्गंधी येत असल्याचा संशय घेऊन कारमध्ये मृतदेह दिसला. नागरिकांनी घुग्घुस पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच एपीआय टोपले, एपीआय गोखरे, एपीआय सिंग, पीएसआय आमटे, मनोज धकाते, रवींद्र वाभिटकर, रणजित भुरसे, नितीन मराठे आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केल्यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात पाठविला, विच्छेदनासाठी चंद्रपूर.
नागरिकांमध्ये चर्चा आहे सदर व्यक्ती हा दारूच्या नशेत कार मध्ये प्रवेश केला असले नंतर कार मध्ये त्याचा स्वास गुदमरून मृत्यु झाला असावा.पुढील तपास API टोपले करण्यासाठी आहेत.
0 comments:
Post a Comment