चंद्रपुर :-मागील आठ दिवसापासून चंद्रपुरात सतत पाउल चालु असुन पावसामुळे चंद्रपुर शहरातील काही नागांमध्ये घरात पाणी साचलेले आहे अशा परिस्थीतीतही चोर घरी कोणी नसल्याचा फायदा घेवून चोरी करत आहे. सिस्टर कॉलनीतील उमाट ले आउटमध्ये तकारदार नाम प्रतिक आवळे यांचे राहत घरी पाणी साचल्याने ते त्यांचे नातेवाईकाकडे राहण्याकरीता गेले असता चौरांनी संधीचा फायदा घेवन त्यांचे घरातील 1) कि. 30,000/- एक काळया रंगाचा सोनी कंपनीचा लॅपटॅप 2) कि 5,000/- एक काळया रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल आयएमईआय के 868453038194997 3 ) कि 20,000/- एक काळ्या रंगाची सॅमसंग कंपनीची एल.ई.डि टि. व्ही (40 इंच ) असा साहित्य चोरून नेले त्यावरून पोरटे रामनगर अप क 770 / 22 कलम 457,380 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास करण्याचे आदेश मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यानी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यानुसार गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मा. बाळासाहेब खाडे यांनी चंद्रपुर उपविभाग पथकास निर्देश दिले. दि. 20/07/2022 रोजी गोपनीय माहिती मिळाली की, पो.स्टे, चंद्रपुर शहर घरफोडीचा रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे विकास उर्फ रॉनी स पन्नी मोहल्ला चंद्रपुर व त्याचा वि.स.बालक मित्र यांनी वरील गुन्हा केल्याचे माहिती प्राप्त झाली त्यावरून त्यांना ताब्यात घेवुन विस्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता वरील गुन्हा केल्याचे कबुल केल्याने सदरचा मुद्देमाल वरील गुन्हयात जती कार्यवाही करून आरोपी य मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पोस्टें रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे सा यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे पोनी स्थानिक
गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात सपोनि संदिप कापडे, सपोनि जितेंद्र बोबडे, नापोशि सतोष येलपुलवार, पो.शि. प्राजल झिलपे, पोशि रविंद्र पंधरे, पोशि गोपाल आतकुलवार, पोशि कुंदनसिंग बावरी यांनी कार्यवाही केली.
0 comments:
Post a Comment