चंद्रपुर :-चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात गॅस दर वाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात "बहोत हो गई
महगाई की मार ,बस करो मोदी सरकार "गॅस दर वाढ कमी करा" "मोदी तेरे राज मे कटोरा आया हात मे "असे नारे देत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनं करण्यात आलेProtest movement of Nationalist Women's Congress against gas price hike
जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके म्हणाल्या
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होत आहे. महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला केंद्र सरकारने पुन्हा धक्का दिला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी नागरिकांना १०५३ रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरने हजारचा आकडा पार गेल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यापूर्वी मे महिन्यातही गॅसच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्वांचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत आहे.वाढत्या महागाईने सामान्य नागरिक बेजार झालेला आहे. मात्र केंद्र सरकार महागाई कमी करण्याऐवजी नेहमी नवे दर जाहीर करून सर्वसामान्यांना एकामागून एक धक्का देत आहे.यावेळी आंदोलनात जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके चंद्रपूर तालुका अध्यक्ष वनिता मावलीकर जिल्हा संघटक सरस्वती गावंडे जिल्हा सचिव नीलिमा नरवडे जिल्हा सचिव नंदा सेरकी जिल्हासहसचिव शोभा घरडे जिल्हा संघटकसचिव प्रमीला पाठक जिल्हा सरचिटणीस दयाबाई गोवर्धन मोनिका मडावी संगीता वद्देट्टीवार महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या
0 comments:
Post a Comment