भद्रावती तालुका प्रतिनिधी : जगन्नाथ विद्यापीठ जयपूर (राजस्थान) येथे आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरीय वुडबॉल स्पर्धेमध्ये विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालयातील खेळाडू गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली आणि आपल्या विजय प्राप्त केला या संघामध्ये महाविद्यालयातील खेळाडू कुमारी शुभांगी भोसकर आणि गुलाबशाह सय्यद यांनी स्ट्रोक इव्हेंट मध्ये सांघिक सुवर्णपदक पटकाविले आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करत हा विजय प्राप्त केला.Vivekananda Arts and Commerce College players win gold medals in All India Inter University Woodball Tournament
विजयी खेळाडूंचे विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोराचे अध्यक्ष मा. मोरेश्वरराव टेंमुर्डे, सचिव श्री. अमन टेंभुर्डे, विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संगिता आर.बांबोडे, डॉ. टोंगे, डॉ. तितरे, डॉ. आस्टुनकर महाविद्यालयातील समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

0 comments:
Post a Comment