Ads

चाकूचा धाक दाखवीत अधिक्षकाचा 13 वर्षीय मुलीवर अत्याचार

 भद्रावती तालुका प्रतिनिधी :-भद्रावती खाजगी आश्रमशाळेतील आठव्या वर्गात शिकणाऱ्या 13 वर्षीय आदिवासी मुलीवरअधिक्षकाने चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार Sexual assault  केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित ही चंद्रपूर जिल्ह्यातील असून आई-वडील नुकतेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे राहायला गेले होते. 
मुलीला चांगले शिक्षण मिळावे यासाठी मागच्या महिन्यात 7 जुलै ला भद्रावती येथील आश्रम शाळेत पीडित मुलीचे नाव दाखल करण्यात आले होते, मात्र 4 ऑगस्टला अचानक आश्रम शाळेतुन पीडितेच्या वडीलाला बोलावीत तुमच्या मुलीची प्रकृती बरोबर नाही आहे सोबत शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जा असे सांगण्यात आले. Minor girl मुलीला सोबत घेत वडील हिंगणघाट येथे पोहचले, पीडितेचे आई-वडील हिंगणघाट येथे भाड्याच्या घरात राहत होते, 1 ते 2 दिवस उलटल्यावर घर मालकीण यांनी मुलीची प्रकृती अशी का? याबाबत विचारणा केली त्यानंतर सदर धक्कादायक प्रकार समोर आला.

याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली व वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात त्या मुलीला नेण्यात आले मात्र पोलीस प्रशासन व रुग्णालयाने सदर प्रकरणी हयगय केली. Rape अत्याचाराचे प्रकरण भाजप आमदार समीर कुणावार यांच्या कानी पडताच त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठत संपूर्ण प्रकरण जाणून घेतले.

आमदार रुग्णालयात पोहचल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व अप्पर
जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी रुग्णालयात दाखल झाले. Pocso

पोलीस प्रशासन व रुग्णालय प्रशासनाने हयगय केल्याने आमदार चांगलेच संतापले, लगेच त्या मुलीची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तपासणीनंतर सदर गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला, मात्र घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली असल्याने सदर प्रकरण भद्रावती पोलीस ठाण्यात वळते केले.

भद्रावती पोलिसांनी पोस्को, एट्रोसिटी वअत्याचाराचा गुन्हा आश्रमशाळा अधीक्षक 53 वर्षीय संजय एकनाथ इटनकर यांच्यावर दाखल केला, आरोपी इटनकर यांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. सदर प्रकरणात आरोपी अधीक्षक इटनकर यांनी पीडितेला चाकूचा धाक दाखवीत अनेकदा अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली. आतापर्यंत अश्या किती मुलींवर अत्याचार किंवा छळवणूक झाली आहे याचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे. भाजप आमदार समीर कुणावार यांच्या आक्रमकतेपणा मुळे उघडकीस आला अन्यथा सदर प्रकरण दाबण्यात आले असते अशी चर्चाजनमानसात सुरू आहे.

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व त्या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार अशी प्रतिक्रिया आमदार कुणावर यांनी दिली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment