Ads

खंडणी करीता शस्त्राचा धाक दाखवून पळवून नेणाऱ्या तिन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली 24 तासाचे आत अटक

चंद्रपुर :-दि. 15/8/22 रोजी तुकूम चंद्रपूर येथून दोन इसमांची दिवसा दुपार दरम्यान खंडणीचा उद्देशाने अपहरण करण्यात आले होते. यातील आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवून फिर्यादी व त्याचा मित्र यांना गाडीत बसवून नागपूर येथील मोमीनपुरा परीसरात घेवून गेले. तेव्हा रात्रो दरम्यान एक आरोपी सिगरेट पिण्या करीता खाली उतरला सदर ठिकाणी लोकांची गर्दी दिसल्याने फिर्यादीचा मित्राने संधी पाहून गाडीचा लॉक काढून जोर जोऱ्यात बचाव बचाव असे ओरडल्याने तेथे लोक व परिसरातील पोलीस तेथे आल्याने आरोपी इसम पळून गेले.
ofabducting on gunpoint for ransomत्यानंतर तहसिल पोलीस नागपूर यांनी सदर घटनेची सुरूवात पोस्टे. दुर्गापूर जि. चंद्रपूर येथे झाल्याने फिर्यादी व त्याचा मित्र यास पो.स्टे. दुर्गापूर येथे घेवून आल्याने दि.16/08/22 रोजी रात्रो दरम्यान फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. दुर्गापूर येथे अप. क्र. 136/ 2022 कलम 384, 385, 364(A), 120 (ब), 143, 147, 149 भादवी सहकलम 4, 25 आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे आदेशान्वये पो. नि. बाळसाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी लागलीच स.पो.नि. बोबडे, स.पो.नि. कापडे, पो.उपनि कावळे यांचे पथक तयार करून आरोपीचे माग घेण्याकरीता मार्गदर्शन करून आदेशीत केले. सदर गुन्हयातील आरोपींचा नविन मोबाईल नंबर प्राप्त करून सायबर • सेलचे मार्फतीने तांत्रीक तपास करून गुप्त माहितीच्या आधारे घुग्घुस येथील ईसम नामे अमित चमन सारीढेक वय 30 वर्ष रा घुग्घुस हा आरोपींचे संपर्कात असल्याबाबत माहिती वरून घुग्घुस येथे गेले असता सदर इसमास अधिक विचारपुस करून त्याने यातील तीन आरोपी नामे 1) मोहम्मद सरताज अब्दुल हाफिज वय 36 वर्ष रा बिनबा गेट रहेमतनगर चंद्रपुर 2 ) शेख नुर शेख ईस्माईल उर्फ रशीद वय 38 वर्ष रा नालसाहब रोड मोमिनपुरा नागपुर 3) अजय पुनमलाल गौर वय 35 वर्ष रा हसापुरी छोटी खदान नागपुर यांना त्याने घुग्घुस येथील द-गेट रेस्टॉरन्ट अॅन्ड लॉज येथे रूमवर थांबले असल्याचे माहिती दिल्यावर सदर लॉजवर गेले असता तिन्ही तीन्ही आरोपी काहि वेळेपूर्वी एका पांढऱ्या रंगाची होन्डाई क्रेटा गाडी क एमएच 48 एसि 8447 ने पसार झाल्याचे कळताच त्यांचा पाठलाग करत असतांना सदर वाहन गडचांदूर मार्गे जात असल्याची खात्रीशीर खबर मिळाल्याने मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे आदेशान्वये SDPO नंदनवार सा. चंद्रपुर व SDPO नाईक साहेब गडचांदुर यांनी सबंधीत पो.स्टे. हद्दीत नाकाबंदी लावली. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक सदर वाहनाचा पाठलाग करीत जात असता. पो.स्टे. कोरपना ठाणेदार याचे संम्पर्कात राहून माहिती देत असता सदर वाहन पो.स्टे. कोरपणा हददीत नाकांबदी दरम्यान पोस्टे कोरपणा येथील पोलीस स्टाफने गाडी क एमएच 48 एसि 8447 हि थांबवीली त्या गाडी मागे असलेले स्थागुशाचे पथकाने सदर आरोपीतांना लागलीच ताब्यात घेवुन यातील वरील तीन्ही आरोपी पकडले. सदर गुन्हयातील तीन्ही आरोपी व गुन्हयातील गाडी ताब्यात घेवुन पोस्टे दुर्गापुर यांचे ताब्यात देण्यात आले..

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अरवींद साळवे, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शेखर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था. गु.शा. चे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पो उप नि अतुल कावळे, पो. हवा. संजय आतकूलवार, ना.पो. कॉ. संतोष येलपुलवार, पो. कॉ. गोपाल आतकुलवार, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे यांनी केली असुन पुढील तपास पो.स्टे. दुर्गापूर येथील पोलीस अधिकारी हे करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment