ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगाण वरून बेटाळा फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने large landslide अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गोसेखुर्द धरणामुळे आलेल्या महापुरामुळे पुलाचे नुकसान झाले आहे.
उमेश धोटे,सरपंच,चौगान
चौगाण वरून बेटाळा फाट्याकडे जाणाऱ्या पुल वजा रपट्याला अतिवृष्टी व गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने निर्माण झालेल्या महापुरामुळे चौगाण वरून बेटाळा फाट्या कडे जाणाऱ्या पुलाला भलेमोठे भगदाड पडले आहे. चौगाण वरुन ब्रम्हपुरीला जाण्यासाठी रात्री अपरात्री याच मार्गाचा अवलंब केला जातो. त्यामुळे एखादा जीवघेणा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तसेच या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात नेहमीच या पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना नाहकचा त्रास सहन करावा लागत असतो. त्यामूळे स्थानीक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या पुलाची दुरुस्ती अथवा या पुल वजा रपट्याच्या जागी मजबूत उंच पुलाची निर्मिती करावी. अशी स्थानीक ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
प्रतिक्रिया १
मौजा चौगान येथे सतत 3 वेळ पूर आल्यामुळे गावाकडे जाणारा रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत तसेच पूलाला खड्डा पडला आहे. ज्यामुळे जीवित हानी होऊ शकते त्यामुळं तात्काळ पुलाची दुरुस्ती करण्यात यावी. आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळें सर्व शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत देण्यात यावी.
उमेश धोटे
सरपंच ग्रामपंचायत चौगान
प्रतिक्रिया २
गेल्या 2 वर्षांपासून गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्याच्या वीसर्गात वाढ होत असल्याने चौगान गावाला पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो. गावात ये-जा करण्याच्या मुख्य मार्गावर असणाऱ्या छोट्या पुलावरून नेहमीच पाणी वाहत असतो त्यामुळे पुलाची दुरवस्था होत आहे. यावेळेस आलेल्या महापुरामुळे पुलावर भलामोठा खड्डा पडला आहे तसेच पुलाचे नुकसान झाले आहे तरी शासनाने मोठी दुर्घटना होण्या अगोदर पुलाची दुरूस्ती करावी व छोट्या पुलावरून नेहमीच पाणी वाहत असल्याने येत्या काळात मोठया उंच पुलाची उपाय योजना करावी.
अंकुश मातेरे
उपसरपंच ग्रामपंचायत चौगान.

0 comments:
Post a Comment