Ads

RCCPL CEMENT MUKUTBAN कंपनीने दलाला च्या जमीन खरेदी केल्यास तीव्र आंदोलन- धनराज कोवे

चंद्रपूर: RCCPL CEMENT MUKUTBAN कंपनीने परसोडा, येथील लाईमस्टोन चुनखडी साठी 756.14 हेक्टर जमीनची लिज मिळवली आहे. मात्र गावातील शेतकऱ्यांना भूलथापा देऊन त्यांच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेत गावातील आदिवासी/गैर आदिवासींच्या जवळपास 250 ते 260 एकर शेतजमीनी दलालमार्फत कवडीमोल भावाने खरेदी केलेले आहे. तेव्हा सदर जमिनी RCEPL कंपनी स्वतः घेण्यास सुरुवात करायला पाहिजे होते. मात्र त्या जमिन खरेदी न करता दलालांनी ज्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या त्या जमीन कंपनी खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
दलाल व कंपनीचे अधिकारी यांचे साटेलोटे आहे ते शेतकऱ्यांना पांगऊन कमीत कमी मोबदला देऊन कवडीमोल भावाने कसे खरेदी करतात येईल याचा कंपनीला व स्वतःला जास्तीत जास्त कसा फायदा करून घेतायेईल असा डाव रचला आहे. तेव्हा दलाल व कंपनीचा धुर्तपणे रचलेला डाव उधळण्या साठी. कंपनी मार्फत खरेदी केल्या जात असलेल्या जमिनीचे खरेदी-विक्री नोंद फेरफार (रजिस्ट्री) करण्यात येऊ नये करिता मा. तहसिलदार तालुका कोरपना यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांन सह निवेदन देण्यात आले. तेव्हा शेतकऱ्याचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी भाजपा आदिवासी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष धनराज कोवे महानगर चंद्रपूर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सांगितलं की कंपनी Lara Act and 2013 नुसार लिजक्षेत्रातील भूसंपादन न करता दलालमार्फत खरेदी केलेल्या ज्या जमीन खरेदीविक्री व्यवहार होत आहे. त्याची दुय्यम निबंधक अधिकारी कोरपणा यांनी कोणतेही शहानिशा न करता दलाल कडून कंपनीच्या नावे विक्री नोंद करण्यास सुरवात केली आहे. RCCPL कंपनीने जमिनी खरेदी करतांना कृषक जमिनीचे अकृषक प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांचे नघेता दुय्यम निबंधक कोरपणा यांनी त्या जमीनी कंपनीच्या नावे करुण शेतकऱ्यानां फसविण्याच काम करीत आहे. ते तात्काळ थांबविण्यात यावे असे सांगितले. तेव्हा सोबत अरुण मैदमवार, गंगाधर कुंठावार व इतर सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांच्या वतीने वरिल विषयासंदर्भात तहसिलदार कोरपणा, दुय्यम निबंधक,मंडळ अधिकारी यांना आक्षेप निवेदन देऊन कंपनीच्या नावे होनारे अवैध विक्री फेरकार थांबविने, संबधित अधिकाऱ्यांवर दलालावर, कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविणे बाबत आक्षेप पत्र व निवेदन देण्यात आले. व पूढे कंपनीच्या नावे जमिनीविक्री झाल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या वतीने धनराजजी कोवे अरुण मैदमवार गंगाधर कुंठावार, कार्तिक गोलावार यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.तेव्हा राजू मैदमवार,विनोद सिगुर्लावार,बापुराव कूचनकार, नरसिंग सीनगुर्लावार, विकास भोयर,डरांना भुमन्ना अन्मवार,यशवंत सिडाम,संजय साखरकर,महादेव रामगिरवार,शालीक भोयर,राहूल खाड़े गुलाब गनपते अरविंद गेडाम,
नितीन गेडाम, भारत पवार,शांताबाई मेश्राम,गणू मेश्राम,दासू आदेवार,मित्तन आडेवार इत्यादी प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment