भद्रावती : कुणबी सोसायटी किल्ला वार्ड भद्रावती येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने हनुमान मंदिर या ठिकाणी सकाळी ध्यानधारणा आणि नंतर रामधून ची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील प्रा. अमोल वा.ठाकरे यांनी ध्यानाचे महत्व तसेच वंदनीय तुकडोजी आणि कर्मयोगी गाडगेबाबा यांचे समाज विकासातील योगदान मार्मिकरित्या विशद करून सांगितले सकाळी मोकळ्या हवेत फिरणे, व्यायाम करणे सुदृढ शरीरासाठी आवश्यक आहे, हा वैज्ञानिक दृष्टिकोन रामधून च्या पाठीमागे आहे. असे प्रमुख मार्गदर्शन करतेवेळी प्राध्यापक अमोल ठाकरे म्हणाले.
या मंडळाच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी हा स्तुत्य उपक्रम चालत असतो कुमारी दीक्षा रासेकरसह अनेक बालगोपालांनी सुद्धा त्यांचे विचार मांडून भजने म्हटली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. वामन नामपल्लीवार, संचालन विनोद रासेकर आणि घनश्याम आस्वले यांनी आभार मानले. यावेळी मा. मनोहर मुरकुटे, डोमाजी टोंगे, पांडुरंग दर्वे, संभाशिव दिवसे, भारत ठक, लताबाई बांदुरकर, साधना भोयर, धाबेकर भजन मंडळ तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सदस्य आणि वार्डातील जेष्ठ नागरिक यांच्यासह मा.मधुकरजी बांदूरकर यांच्या प्रेरणेने सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

0 comments:
Post a Comment