घुग्घुस : काल दिनांक 06 ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या धो - धो पावसाने मागील महिन्या भराचा रेकॉर्ड मोडला शहरातील अनेक भागात नाल्या गटारी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरून अतोनात नुकसान झाले आहे.
मात्र वेकोलीच्या बेजवाबदर व ढिसाळ नियोजनामुळे रेल्वे सायडिंग जवळ मोठा नाला बनवून अर्धवट सोडण्यात आला या नाल्यामुळे बँक ऑफ इंडिया मागील वस्तीत राहणाऱ्या लोकांचे आयुष्यच उध्वस्त झाले.Congress surrounded Sub Area Manager office with angry citizens
नाल्यातला पाणी काही मिनिटाच्या काळात काही कळण्या आधीच नागरिकांच्या घरात शिरले घरातील अन्न धान्य कपडे लत्ते खाद्य पदार्थ इलेक्ट्रिकल साहित्याचा नुकसान झाले एक निराधार माऊली खाटे सह वाहायला लागली असता नागरिकांनी तिचा जीव वाचवला काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी नाला बंद करण्यासाठी जेसीबी मशीन घेवून तात्ळीने नागरिकांच्या मदतीला पोहचले व वेकोली अधिकारी फुल्लारे यांना वस्तीत बोलावून नुकसानग्रस्त घराची पाहणी केली.
आज रविवार दिनांक 07 ऑगस्ट रोजी बँक ऑफ इंडिया येथील जवळपास शंभर ते दीडशे नागरिकांना घेवून काँग्रेस नेते सैय्यद अनवर व इर्शाद कुरेशी यांनी वेकोलीच्या कार्यालयाला घेराव टाकला संतप्त नागरिकांचा रौद्ररूप बघून सब एरिया मॅनेजर फुल्लारे यांनी एरिया कार्यालयाला सदर नुकसानीची माहिती देवून भरपाई देण्यास बाध्य करण्याचे आश्वासनानंतरच काँग्रेस पदाधिकारी व नागरिकांनी कार्यालय सोडले
यानंतर पटवारी कार्तिक आत्राम यांना बोलावून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे तैयार करण्यात आले.
काल झालेल्या जवळपास तीस चाळीस नागरिकांच्या घराचे जास्त नुकसान झाले आहे
0 comments:
Post a Comment