Ads

आयुष भारत संघटनेचे उपसंचालक आरोग्‍य विभाग पुणे यांच्या कार्यालयासमोर 05 ऑक्टोबरला अमर उपोषण

सोलापूर प्रतिनिधी :पुणे विभागात पॅथी प्रमाणे प्रॅक्टिस करित असणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध जिल्हा परिषद आरोग्य विभाग महानगरपालिका तसेच आरोग्य विभागाकडून बोगस वैद्यकीय व्यावसायिक म्हणून चुकीची कारवाई न होण्याबाबत तसेच मा. उच्च न्यायालय मुंबई, मा.औरंगाबाद हायकोर्ट, मा. बार्शी न्यायालय, मा. मंगळवेढा न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांचा अवमान होऊ नये म्हणून दिनांक 05 ऑक्टोबर रोजी उपसंचालक आरोग्य विभाग यांच्या कार्यालयासमोर आयुष भारत संघटनेच्या वतीने अमर उपोषण करण्यात येणार आहे.
आम्ही आयुष भारत डॉक्टर संघटनेच्या वतीने आज रोजी उपसंचालक आरोग्य विभाग पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे. सध्या पुणे विभागातील व इतर ठिकाणी बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई होणेकामी प्रशासनास प्राप्त झाले आहे परंतु जिल्हा प्रशासनाने केंद्र शासन, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाकडे तसेच मा.हायकोर्ट मुंबई, मा.औरगाबांद खंडपीठ, मा.मंगळवेढा न्यायालय, मा.बार्शी न्यायालय, तुळजापूर न्यायालय, कुरुंदवाड न्यायालय, तसेच जिल्हा सत्र न्यायालय व बरेच तालुका न्यायालय यांच्या निकालपत्रांकडे डोळेझाक करून आदेश पारीत केलेले आहेत परंतु पॅथी प्रमाणे प्रॅक्टिस करणाऱ्या नॅचरोपॅथी, इलेक्ट्रोपॅथी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, CMS & Ed व इतर पॅथी यांच्यावर वैद्यकीय व्यवसायिकांवर बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करू नये असे आदेश केंद्र शासन, राज्य शासन उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, जिल्हा, तालुका न्यायालय अशा विविध न्यायालयाच्या आदेशावरून सिद्ध झालेले आहे तरी सदर वैद्यकीय व्यवसायिकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्यास सदरची कारवाई मा. हायकोर्ट मुंबई, मा. औरंगाबाद खंडपीठ.मा बार्शी न्यायालय, मा. मंगळवेढा न्यायालय. मा. सर्वोच्च न्यायालय यांचा अवमान ठरेल व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालय अवमान प्रकरणी contempt of court ची कारवाई होऊ शकते. तरी जिल्हा प्रशासनाने केंद्र शासन, राज्य शासन मा.उच्च न्यायालय, मा औरंगाबाद खंडपीठ, मा मंगळवेढा न्यायालय, मा. बार्शी न्यायालय, मा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवलोकन करून व सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून पॅथी प्रमाणे प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायिकांविरुद्ध कारवाई करू नये व दहा दिवसांमध्ये आम्हाला लेखी स्वरुपात उत्तर द्यावे अन्यथा 05 ऑक्टोबर पासून आयुष भारतच्या वतीने उपसंचालक आरोग्य विभाग पुणे यांच्या कार्यालयासमोर अमर उपोषण करण्यात येईल असे निवेदन उपसंचालक आरोग्य विभाग पुणे यांना डॉ.अमीर मुलाणी आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment