Ads

शहरातील रामाळा तलावात उडी घेऊन 41 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

चंद्रपूर :-शहरातील रामाळा तलावात उडी घेऊन एका 41 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. प्रकाश पोटवार असे मृतकाचे नाव असून, ते वृत्तपत्र क्षेत्रात वितरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.
 41-year-old youth committed suicide by jumping into Ramala lake in Chandrapur
मिळालेल्या माहितीनुसार मृतक प्रकाश पोटवार हे जिल्हा स्टेडियम जवळ राहत होते. मागील 3 दिवसापासून ते बेपत्ता होते... याची तक्रार मृतकाच्या परिवाराने रामनगर पोलिसात दाखल केली होती. दरम्यान आज मंगळवारी शहरातील रामाळा तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment