ब्रम्हपुरी:-कोरोना काळात सर्वत्र ताळेबंदी असल्यामुळे गणेश उत्सवावर निर्बंध होते. यामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करता आला नाही. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे सर्वत्र गणेशउत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. परंतु अशा परिस्थितीत पोलीस विभागाच्या वतीने गणपती विसर्जनात डीजे वाजवायला परवानगी नाकारण्यात येत आहे. राज्यातील भाजपा - सेना युती सरकारने डीजे वाजवता येणार असे सांगितल्या असल्यानंतर सुद्धा ब्रह्मपुरी येथे स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून कोणत्याच गणेश मंडळाला डीजे ची परवानगी नाकारण्यात येत आहे.
या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा सचिव तनय देशकर यांनी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री मान. ना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. इतर सर्व कार्यक्रमांसाठी डी. जे ची परवानगी पोलीस विभागाच्या वतीने देण्यात येते. परंतु हिंदू धर्माचा मुख्य सण असलेल्या गणेशोत्सवात डी. जे ची परवानगी नाकारल्याने गणेश भक्तांमध्ये कमालीची नाराजी आहे. गणेश भक्तांचा उत्साहात द्विगुणित व्हावा म्हणून विसर्जन मिरवणुकीत डी. जे वाजवायची परवानगी देण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्याची विनंती तनय देशकर यांनी पत्राद्वारे मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना केली आहे.

0 comments:
Post a Comment