भद्रावती :- शहरातील खापरी येथे राहणाऱ्या २८ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला.Two years imprisonment for the accused in molestation case.
प्रशांत पुंडलिक मत्ते वय ३२ वर्ष राहणार कुणबी सोसायटी भद्रावती असे कारावास ठोकणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने २o१५ मध्ये २८ वर्षीय युवती आपल्या चुलत बहिणी सोबत जात असताना तिचा जबरदस्तीने हात पकडून दुचाकी वाहनावर बसवण्याचा प्रयत्न करुन तिचा विनयभंग केला. त्या युवतीने आपला कसाबसा हात सोडून पोलीस स्टेशन गाठले व प्रशांत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोन वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याचा सश्रम कारावासाची सजा ठोठावली या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार सलीम शेख यांनी केला प्रभारी अधिकारी म्हणून ठाणेदार गोपाल भारती यांनी काम पाहिले. न्यायाधीश शर्मा हे होते तर सरकारी वकील म्हणून खंडाळकर यांनी काम पाहिले.
0 comments:
Post a Comment