Ads

के जी एन पब्लिक स्कूल बाबूपेठ येथे निशुल्क रोग निदान शिबिर संपन्न.

चंद्रपुर :-दिनांक २५ सप्टेंबर 2022 रोज रविवारला परिवार विकास फाउंडेशन, मानवटकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल,यशवंत सिडाम व एकदंत साई गणेश मंडल बाबूपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने बाबूपेठ चंद्रपूर येथे आयोजित रोगनिदान शिबिराचे उदघाटन डॉ. माधुरी मानवटकर यांच्या हस्ते रविवार रोजी दुपारी वाजता संपन्न झाले. या शिबिरात स्त्रीरोग अस्थिरोग बालरोग दंतचिकित्सा त्वचारोग जनरल तपासणी बी पी शुगर या सर्व प्रकारच्या रोगांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरात बाबूपेठ परिसरातील लोकांनी शेकडो च्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.

Free disease diagnosis camp concluded at KGN Public School Babupeth. सदर शिबीर के जी एन पब्लिक स्कूल बाबूपेठ चंद्रपूर येथे घेण्यात आले यावेळी महानगरातील प्रसिद्ध डॉ. माधुरी मानवटकर जनरल सर्जन, डॉ. उल्हास बोरकर अस्थिरोगतज्ञ, डॉ. निश्चिता जनरल फिजिशियन, डॉ.प्रदीप चव्हाण दंतरोगतज्ज्ञ, डॉ.शैलेश वांदिले बालरोगतज्ज्ञ, डॉ. वीणा बनसोडे त्वचारोगतज्ज्ञ,आणि सिस्टर व सहकारी यांची उपस्थिती होती.
शिबिराचे आयोजक यशवंत सिडाम ( सामाजिक कार्यकर्ता ) परिवार विकास फाउंडेशन चे संचालक महेश भंडारे, हेमंत त्रिवेदी, अशोक अक्केवार, अरविंद बुरांडे सर, सचिन आत्राम, (अध्यक्ष गणेश मंडल ) तुषार कालंभे, यश सिडाम, साहिल मुजारीया, कादिर शेख, रोशन चिलगैये, सौ महानंदा वाळके (माजी नगर सेविका) संतोषी सिडाम ( सचिव, महील बचत गट ) जय मुजारीया, अरुणा यशवंत सिडाम ( अध्यक्ष महिला बचत गट ) व एकदंत साई गणेश मंडळाचे कार्यकर्ते आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment