Ads

ब्रम्हपुरी सेक्स रॅकेट प्रकरणी अनेक प्रतिष्ठित व्यावसायिकासह आता पर्यंत नऊ जणांना अटक

ब्रह्मपुरी :- ब्रह्मपुरीतील सेक्स रॅकेटचे the sex racket in Brahmapuri प्रकरण अवघ्या राज्यात गाजत असताना पोलिसांनी आता पर्यंत नऊ लोकांना अटक करण्यात आहे. आरोपींमध्ये एक शिक्षक, नगरपालिकेचा कर्मचारी, दारू व्यावसायिक व दारू सप्लाय करणारे दोघे जण असल्याची माहिती असून, या प्रकरणातील आरोपींची संख्या नऊवर पोहोचली आहे.
Nine people have been arrested so far, including many prominent businessmen in the Bramhapuri sex racket case
ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये ब्रम्हपुरी येथील मंजित लोणारे व चंदा लोणारे वडसा येथील अरविंद इंदुरकर वय 47, रुपेश बुराडे वय 28, राजकुमार उंदिरवाडे वय 42 शिवराम हाके वय 40 तर लाखांदूरचे नामे प्रकाश परशुरामकर वय 35, सौरभ बोरकर वय 22. गौरव हरिनखेडे वय 21 या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वीच एका दाम्पत्याला ब्रह्मपुरीतून अटक करण्यात आला होती. ब्रह्मपुरीत बाहेरून मुली आणून देहविक्रीचा व्यापार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार एका सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून पोलिसांनी उघड केला आहे. कोलकाता येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून ब्रह्मपुरीतील विदर्भ इस्टेट कॉलनीत आणले होते. त्या कॉलनीत भाड्याचे घर घेऊन राहणाऱ्या लोणारे दाम्पत्याकडून हा घृणास्पद व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर १७ सप्टेंबरला पोलिसांनी सापळा रचून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी मंजित लोणारे व चंदा लोणारे या दाम्पत्यावर मानव तस्करी अधिनियम, पोक्सो, पिटा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती.

माहितीनुसार, पोलीस तपासादरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी वडसा व लाखांदूर येथे गेल्याची माहिती मिळाल्याने ब्रह्मपुरी पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवून शनिवारी या प्रकरणात पुन्हा सात लोकांवर मानव तस्करी अधिनियम, पोक्सो, पिटा ३७६, ३७६
(३) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून अटक
करण्यात आली आहे. सर्व आरोपींची न्यायालीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment