Ads

स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी महानगरासाठी लोकचळवळ उभारावी - हंसराज अहीर

चंद्रपूर:- पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी जी यांच्या जन्मदिवसापासून ते गांधी जयंती पर्यंत आयोजित ’सेवा पंधरवडा’ निमित्त दि. 26 सप्टेंबर रोजी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनात भाजपा मध्य मंडळाच्या वतीने विठ्ठल मंदीर परिसरातील विठोबा खिडकी परकोटाजवळ स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
People's movement should be built for a clean, beautiful and healthy metropolis - Hansraj Ahir
या मोहिमेत इकेा-प्रो चे संस्थापक बंडू धोतरे, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, सचिन कोतपल्लीवार, सुर्यकांत कुचनवार, राजु खांडेकर, पुनम तिवारी, राहुल अंबीरवार, अशोक अंबीरवार यांनी सहभाग घेतला. इको-प्रो या संस्थेच्या माध्यमातून ऐतिहासिक वास्तु परिसरात स्वच्छताविषयक कार्यातून देण्यात येत असलेल्या योगदानाबद्दल पूर्व केद्रीय राज्यमंत्री अहीर यांनी प्रशंसा केली. यावेळी या स्वच्छता कार्यात योगदान देणाÚया सफाई कामगार बांधवांना अहीर यांनी टी-शर्ट देवुन त्यांचा सन्मान केला. स्वच्छता कार्याच्या माध्यमातून चंद्रपूर महानगरास स्वच्छ, सुंदर व निरोगी बनविण्यात लोकचळवळीच्या माध्यमातून सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.
या स्वच्छता मोहीमेत आरोग्य विभागाचे निरिक्षक भुपेश गोटे, आरोग्य विभागाचे चमू, सफााई कामगार बांधव व वैभव रामीडवार, छोटू दरणे, मारोती रामेडवार यांचेसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment